हैदराबाद :वैशाख शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन अधर्मी आणि अहंकारी राजा हिरण्यकशपूचा वध केल्याची कथा पुराणात कथन करण्यात येते. त्यामुळे का भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला याबाबतची माहिती आपण या लेखात आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासह कधी आहे नरसिंह जयंती, कधी आहे शुभ मुहुर्त याबाबतची माहितीही आम्ही तुम्हाला देणार आहोत.
काय आहे नरसिंह जयंतीची अख्यायिका :अधर्म आणि अहंकाराचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी पाचवा अवतार घेत नरसिंहाच्या रुपात हिरण्यकशपूचा वध केला. भगवान विष्णूंच्या सगळ्या अवतारात नरसिंह हा अवतार उग्र मानण्यात येतो. मात्र भगवान विष्णू सदैव आपल्या भक्तांसाठी शीतल आणि सौम्य असल्याचेच दिसून येते.
कधी आहे नरसिंह जयंतीचा शूभ मुहुर्त :नरसिंह जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. नरसिंह जयंतीला भाविक मोठ्या भक्तीभावाने भगवान विष्णूंची पूजा आराधना करतात. त्यामुळे नरसिंह जयंतीचा पूजा विधी करण्याचा शुभ मुहुर्त कधी आहे, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी नरसिंह जयंती 3 मेच्या रात्री 11 वाजून 49 मिनीटांनी सुरू होणार असून 4 मेच्या रात्री 11 वाजून 44 मिनीटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे नरसिंह जयंती 4 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. नरसिंह जयंतीची पूजा सकाळी 10 वाजून 58 मिनीटापासून ते दुपारी 1 वाजून 38 मिनीटांपर्यंत राहणार आहे. संध्याकाळी पूजा मुहुर्त 4 वाजून 18 मिनीटांपासून ते 6 वाजून 58 मिनीटांपर्यंत राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान भाविकांना भगवान विष्णूंची पूजा करता येणार आहे.
काय आहे नरसिंह जयंतीचे महत्व :नरसिंहाने हिरण्यकशपूचे पोट फाडून त्याचा वध केल्याची अख्यायिका पुराणात कथन करण्यात येते. त्यामुळे भगवान विष्णुंच्या सगळ्या अवतारात नरसिंह अवतार सगळ्यात उग्र मानण्यात येते. नरसिंहाच्या परम भक्ततीमुळेच भक्त प्रल्हादला वैकुंठ धामाचे पुण्य मिळाल्याचे या पुराणातील कथेत नमूद करण्यात आले आहे. नरसिंहाच्या पूजा केल्याने माणसिक आणि शारीरिक शक्ती प्राप्त होत असल्याची भक्तांची धारणा आहे. सगळी भीती दूर होऊन शत्रूंचा नाश होत असल्याचे पुराणात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - May 2023 Vrat Festival : मे महिन्यात कोणते आहेत महत्वाचे सण, उत्सव आणि व्रत, जाणून घ्या सविस्तर माहिती