महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Nails Care Tips : सारखं नखं तुटण्याचा होतोय त्रास ? करा 'हे' उपाय... - नखं लांब असतात

Nails Care Tips : हातांचं सौंदर्य वाढवण्यात नखांची महत्त्वाची भूमिका असते. पण ते तुटल्यावर अनेक समस्या येतात. नखं तुटण्यापासून कसे रोखायचे आणि त्यांच्या काळजीसाठी कोणते घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात ते जाणून घ्या.

Nails Care Tips
नखं तुटण्याचा होतोय त्रास

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 10:07 AM IST

हैदराबाद : केवळ चेहऱ्याचं सौंदर्यच नाही तर हात-पायांच्या सौंदर्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. किंबहुना आता चेहऱ्यासोबत हातही नजरेस पडतात. ज्या लोकांची नखं लांब असतात त्यांना अनेकदा तुटण्याच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. जेव्हा नखं ​​तुटतात तेव्हा ते वाकलेले किंवा वेडेवाकडे दिसतात, जे खूप वाईट दिसतं. नखं तुटण्यामागे अनेक कारणं असू शकतात. नखे तुटण्यापासून रोखण्यासाठी किंवा त्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. नखं तुटण्यापासून रोखण्यासाठी, त्यांच्या आरोग्याकडं लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय काही ब्युटी टिप्स किंवा घरगुती उपायांचा अवलंब करून त्यांना निरोगी आणि चमकदार बनवता येतं.

पोषक तत्वांची काळजी घ्या : शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास नखांनाही त्याचा फटका सहन करावा लागतो. नखांच्या वाढीमध्ये कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावतं. याशिवाय व्हिटॅमिन सी देखील त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुमच्या आहारात दूध, अंडी किंवा इतर आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा. व्हिटॅमिन सी साठी, हिरव्या भाज्या आणि आंबट पदार्थ आपल्या दिनचर्याचा एक भाग बनवा.

क्युटिकल्स टाळा :नखांजवळील त्वचा वारंवार खराब होत असेल तर नखेही कमकुवत होऊ लागतात. क्युटिकल्स खराब झाल्यास देखील वेदना होतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी नखांवर खोबरेल तेल लावण्याची सवय लावा.

खोबरेल तेल आणि मीठ : खोबरेल तेलात मीठ मिसळून नखांवर लावा. या तेलात काही मिनिटं नखं बुडवून ठेवा. हे नियमितपणे रात्रीच्या वेळी करा आणि काही दिवसातच तुम्हाला नखांची चांगली वाढ जाणवेल.

कृत्रिम नखं वापरू नका : तुटलेली किंवा वाकडी नखे लपविण्यासाठी कृत्रिम नखे वापरतात. त्यांच्या वापरामुळे नखे अधिक कमकुवत होऊ शकतात. असं मानलं जातं की या गोष्टींमध्ये रसायनं असतात, ज्याचा जास्त वापर केल्यानं नखांचं आरोग्य बिघडू शकतं.

तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा : लांब नखं तुटण्यापासून रोखण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या नखांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा :

  1. Benefits of steam : वाफ घेतल्यानं मिळते चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून सुटका; जाणून घ्या फायदे
  2. Foods For Sinus Relief : सायनसच्या संसर्गापासून आराम मिळवायचाय? आहारात करा आरोग्यदायी पदार्थांचा समावेश...
  3. Tulsi Oil Benefits : केसांच्या समस्येपासून हैराण आहात? वापरून पाहा तुळशीचं तेल...

ABOUT THE AUTHOR

...view details