महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

संगीत थेरेपीमुळे 'या' विकारांपासून मिळू शकतो आराम - संगीत थेरेपी दुष्परिणाम

गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आरोग्यास निरोगी ठेवण्यात संगीताच्या भूमिकेविषयी आणि संगीत थेरेपीच्या ( music therapy ) लाभांविषयी अनेक शोध आणि आभ्यास करण्यात आले आहेत. ज्याचे परिणाम हे सिद्ध करतात की, मोठे व्यक्ती असो किंवा छोटी मुले, संगीत मानसिक समस्यांपासून आराम देण्यात खूप फायदेशीर ठरू शकते.

music
संगीत

By

Published : Dec 11, 2021, 4:59 PM IST

देश विदेशात करण्यात आलेले अनेक शोध या बाबीची पुष्टी करतात की, संगीत तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. संगीत आणि संगीत थेरेपीचे मानसिक आरोग्यावर परिणामाबाबत करण्यात आलेल्या शोधांचे परिणाम हे सांगतात की, संगीत थेरेपी ( music therapy ) नैराश्य, पी.टी.एस.डी आणि स्किझोफ्रेनिया ( schizophrenia ) सारख्या अनेक मानसिक आरोग्य विकारांमध्ये आराम देते.

संगीत थेरेपीबाबत केलेले विविध अध्ययन

वर्ष 2012 मध्ये यूकेच्या ब्रुनेल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ईईजीच्या ( Electroencephalogram EEG ) मदतीने ब्रेनवेवमध्ये होणाऱ्या बदलांवर शोध केला. यामध्ये संगीताबरोबर व्यायाम करणे किंवा कोणत्याही संगीताविना व्यायाम करताना मेंदूच्या लहरींमध्ये होणाऱ्या बदलांवर आभ्यास करण्यात आला. या आभ्यासाच्या निकालांमध्ये तज्ज्ञांना असे आढळून आले की, संगीतामुळे मेंदूच्या विद्युत लहरींमध्ये (electric waves) बदल घडून आला होता, ज्यामुळे व्यायामात आनंदाच्या अनुभवाची पातळी 13 टक्क्यांनी वाढल्याचे आढळून आले होते. आभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये संशोधकांनी सांगीताला कार्यक्षमता वाढवणारे औषध, थकवा दूर करणे आणि सकारात्मकतेचा संचार करणाऱ्या औषधीच्या रुपात उल्लेखले होते.

अमेरिकन अकादमीच्या ( American Academy ) रिसर्च जर्नलमध्ये देखील संगीत आणि मानसिक आरोग्यातील संबंधांबाबत एक शोध प्रकाशित करण्यात आला होते. या संशोधनात व्हरमाँट विद्यापीठाच्या ( Vermont University ) कॉलेज ऑफ मेडिसिन विभागाच्या बाल मानसोपचार तज्ज्ञांच्या पथकाने मुलांच्या मेंदूवर सांगीताच्या प्रभावाबाबत अध्ययन केले होते. या संशोधनात संशोधक आणि व्हरमाँट सेंटर फॉर चिल्ड्रन यूथ अँड फॅमिलीजचे ( Vermont Centre for Children, Youth and Families ) संचालक आणि मानसोपचार तज्ज्ञ प्रा. जेम्स हुजॅक आणि त्यांचे सहकारी मॅथ्यू अलबाग आणि संशोधन सहाय्यक एलिन क्रेहन यांना असे दिसून आले की, संगीत वाद्य यंत्र वाजवल्याने मेंदूच्या विकासावर खूप खोलवर परिणाम होतो. संशोधनात 6 ते 12 वर्षांच्या 232 मुलांच्या मेंदूला स्कॅन करण्यात आले होते. आभ्यासात मुलांच्या मेंदूच्या कारटेक्सवर संगीताच्या प्रभावाचे मुल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये असे दिसून आले की, संगीत वादन मेंदू संचालन केंद्रांना सक्रिय करते, ज्यामुळे मेंदूच्या त्या भागांमध्ये परिवर्तन येतो जे भाग व्यवहार नियंत्रणाचे कार्य करतात.

संगीत कसे उपयुक्त ठरू शकते ते जाणून घेऊया

तज्ज्ञ सांगतात की, विविध प्रकारचे संगीत वेगवेगळ्या न्यूरॉलॉजिकल प्रतिक्रियांना ( Neurological Reactions ) उद्घाटित करते. तज्ज्ञांच्या मते संगीत उपचार किंवा थेरेपीचे काही प्रमुख फायदे पुढील प्रमाणे आहेत.

भ्रमापासून देऊ शकतो आराम

तज्ज्ञांचे मत आणि या विषयावर केलेल्या आनेक संशोधनांचे निष्कर्ष देखील सांगतात की, संगीत थेरेपी किंवा केवळ संगीत ऐकल्यानेच अल्झायमर, डिमेंशिया, व्याकूळता, आक्रमकता, स्मृतिभ्रंश आणि इतर मानसिक आरोग्य स्थितींमध्ये आराम मिळू शकते.

विशेष म्हणजे, संगीताचा उपयोग संवेदी आणि बौद्धिक उत्तेजनाच्या रुपात देखील केला जाऊ शकतो, जो कुण्या व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता राखून ठेवण्यास मदत करू शकते.

चांगली झोप येण्यास मदत करू शकते

द जर्नल ऑफ पेरीएनेस्थेशिया नर्सिंगमध्ये ( The Journal of PeriAnesthesia Nursing ) प्रकाशित एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, संगीत थेरेपी झोप न आल्यास झोपेच्या गोळ्यांसारखा परिणाम करू शकते. संशोधनात तज्ज्ञ सांगतात की, छोट्यांपासून मोठ्या प्रौढांपर्यंत निद्रानाश सारख्या समस्या आणि झोपेची गुणवत्ता चांगली करण्यात संगीत खूप मदत करू शकते. संशोधनात पेन्सिलव्हेनियाच्या एका विद्यापीठाच्या तज्ज्ञांना असे दिसून आले की, जे लोक 7 दिवसांसाठी रात्री केवळ 4 ते 5 तासांची झोप घेत होते ते सामान्यत: मानसिकरित्या अधिक थकलेले, तणावग्रस्त आणि अधिक राग येत असल्याचा अनुभव करत होते.

स्ट्रोकचा धोका कमी करू शकते

द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डियोलॉजीमध्ये ( The International Journal of Cardiology ) प्रकाशित संगीत थेरेपी आणि रक्तचापावरील संशोधनावरून असे लक्षात आले की, संगीत थेरेपी सिस्टोलिक रक्तदाबाला कमी करण्यास सक्षम आहे, जे स्ट्रोकच्या धोक्याला कमी करते.

संवेदी समस्यांमध्ये संगीत थेरपी

संगीत थेरेपीमध्ये संवेदी समस्या ( Sensory Problems ), सामाजिक कौशल्ये, आत्मनिर्भरता, संज्ञानात्मक क्षमता आणि मोटर कौशल्याला चांगले करण्यासाठी संगिताचा उपयोग केला जातो. जगभरात मोठ्या प्रमाणात लोक नैराश्य आणि इतर मानसिक परिस्थितींचा व समस्यांचा सामना करतात. अशात संगीत थेरेपी लोकांना कोणतेही दुष्परिणाम नसलेले उपचार म्हणून मदत करू शकते.

हेही वाचा -'हा' योग आरोग्यासह रोमांस देखील वाढवू शकतो, वाचा...

ABOUT THE AUTHOR

...view details