महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Mushroom Side Effects : पचनाच्या समस्यांपासून ते लठ्ठपणापर्यंत, जाणून घ्या मशरूम खाण्याचे दुष्परिणाम - पोषक घटक

मशरूमची भाजी खूप चविष्ट असते. ते उत्तम चवीसह आरोग्यवर्धकही आहेत. मशरूममध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. पण मशरूम खाण्याचे काही तोटे आहेत. ज्या लोकांना बद्धकोष्ठाची समस्या आहेत त्यांनी मशरूम खाणं टाळावं. जाणून घेऊ या मशरूमचे दुष्परिणाम.

Mushroom Side Effects
मशरूम खाण्याचे दुष्परिणाम

By

Published : Aug 18, 2023, 10:14 AM IST

Updated : Aug 18, 2023, 1:00 PM IST

हैदराबाद : मशरूममध्ये प्रथिनं तसंच अनेक पोषक घटक असतात. पण पौष्टिक फायदे मिळविण्यासाठी, मशरूम योग्य प्रकारे शिजवा. तुम्हाला ठाऊक आहे, जे लोक जंगली मशरूम खातात, त्यांना गंभीर आजार होऊ शकतात? संधिवात, ल्युपस, दमा यांसारखे स्वयंप्रतिकार रोग असलेल्यांनी मशरूमचे सेवन टाळावे.

जंगली मशरूम खाण्याचे तोटे

  • थकवा: मशरूम खाल्ल्यानंतर काही लोकांना अशक्तपणा जाणवू शकतो. एवढंच नाही तर यामुळे तुम्हाला अस्वस्थ आणि सुस्तही वाटू शकतं. याचा अनेकांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम झाला आहे.
  • पचन समस्या: मशरूममध्ये साध्या कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असतं जे पचण्यास कठीण असतं. हे कार्बोहायड्रेट्स मोठ्या आतड्यातून पचत नसल्यामुळे, ते आपल्या आतड्यांतील मायक्रोबायोटाद्वारे आंबवले जातात. त्यामुळे काही लोकांमध्ये गॅस निर्मिती आणि पाचन समस्या उद्भवू शकतात.
  • त्वचा ऍलर्जी: काही लोकांना मशरूमची एलर्जी असू शकते, ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेवर पुरळ आणि जळजळ देखील होऊ शकते. काही लोकांना नाकातून रक्त येणे, तोंड कोरडं होणं, नाक कोरडं होणं आणि इतर समस्यांचा त्रास होऊ शकतो.
  • गर्भधारणेदरम्यान खाणं टाळा :अनेक स्तनदा आणि गरोदर महिलांना मशरूम न खाण्याचा सल्ला दिला जातो. आतापर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम नोंदवले गेले नाहीत, परंतु मशरूम घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • वजन वाढू शकतं : मशरूममध्ये ट्रिप्टामाइन्स असतात. यामध्ये अ‍ॅम्फेटामाइन (औषध) सारखे कार्य करणारी आणि भूक वाढवणारी रसायनं असतात.
  • पोट खराब होऊ शकतं : जास्त प्रमाणात मशरूम खाल्ल्याने पोट खराब होऊ शकतं. याचं अतिसेवन केल्याने अतिसार, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. त्यामुळे याचे जास्त प्रमाणात सेवन करणं शरीरासाठी अपायकारक आहे.
  • डोकेदुखी : मशरूमचं जास्त सेवन केल्यानेही डोकेदुखी होऊ शकते. यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. त्यामुळे याचं अतिसेवन टाळा. मशरूमचं सेवन मर्यादित प्रमाणातच करा.

हेही वाचा :

  1. Eyes Care Tips : तुमचा फोन किंवा लॅपटॉप वापरताना तुमच्या डोळ्यात त्रास होत असेल तर या पद्धतींचा अवलंब करा, तुम्हाला मिळेल आराम
  2. Phubbing : म्हणजे काय... जे आजकाल नात्यात दरी निर्माण करण्याचे बनत आहे कारण...
  3. Skipping Health Benefits : पोटाभोवतीची चरबी कमी करायची आहे का?.. रोज 'स्किपिंग' करा
Last Updated : Aug 18, 2023, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details