महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

मोहिनी एकादशी 2023 : कशामुळे साजरी करण्यात येते मोहिनी एकादशी, जाणून घ्या आख्यायिका - मोहिनी एकादशी माहिती

असुरांना मोहित करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी रुप धारण केले होते. तेव्हापासून वैशाख शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. या दिवशी व्रत केल्याने सगळ्या पापांचा नाश होत असल्याचे बोलले जाते.

Mohini Ekadashi 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 27, 2023, 1:07 PM IST

Updated : May 1, 2023, 9:46 AM IST

हैदराबाद : यावर्षी मोहिनी एकादशी 1 मे रोजी साजरी करण्यात येत आहे. भगवान विष्णूंनी मोहिनी रुप धारण केल्याची अख्यायिका पुराणात सांगितली जाते. मात्र का भगवान विष्णूंनी मोहिनी रुप धारणे केले, काय आहे मोहिनी एकादशी, का मोहिनी एकादशी साजरी करण्यात येते याबाबतची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

का साजरी करण्यात येते मोहिनी एकादशी :वैशाख शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी असे संबोधले जाते. भगवान विष्णूंनी वैशाख शुक्ल पक्षाच्या एकादशीला असुरांचा विनाश करण्यासाठी मोहिनी रुप धारण केले होते. त्यामुळे देवांना विजय मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी रुप धारण करुन असुरांना मोहित केले होते. भगवान विष्णूंच्या या मोहिनी रुपावर असुर मोहित झाल्याने असुरांचा पराभव झाला. असुर भगवान विष्णूंनी धारण केलेल्या सुंदर स्त्रीवर मोहित झाल्याने या युद्धात देवांचा विजय झाल्याची आख्यायिका पुराणात नमूद करण्यात आली आहे. मोहिनी रुप हा भगवान विष्णूंचा एकमेव अवतार असल्याचे पुराणात नमूद करण्यात आले आहे.

काय आहे मोहिनी रुपाचे महत्व :भगवान विष्णूनी वैशाख शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी रुप धारण केल्याने या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात. या एकादशीला व्रत केल्यामुळे मानव संसाराच्या मोहजालातून मुक्त होत असल्याची मान्यता आहे. मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने मानवाची सगळ्या पापांचा विनाश होतो. त्यांची सगळी दुखे दूर होतात. या पृथ्वी तलावर एकादशी व्रतासारखे दुसरे कोणतेच व्रत नसल्याचे शास्त्रात कथन करण्यात आले आहे. त्यामुळे एकादशीला केलेल्या व्रताचे पुण्य सहस्त्र गोदानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मोहिनी एकादशीला श्रेष्ठ एकादशी असल्याचे बोलले जाते.

कधी आहे मोहिनी एकादशी व्रताचा मुहूर्त :मोहिनी एकादशी सोमवारी 1 मे रोजी असून ती देशभरात साजरी करण्यात येते. मोहिनी एकादशीची सुरुवात वैशाख शुक्ल एकादशीची तिथी 30 एप्रिलच्या रात्री 08 वाजून 28 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर मोहिनी एकादशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 मेच्या रात्री 10 वाजून 09 मिनिटापर्यंत सुरू राहणार आहे. एकादशीचा पूजा मुहुर्त सकाळी 09.00 ते 10.39 च्या दरम्यान आहे. त्यामुळे भाविक या वेळेच्या दरम्यान पूजा करू शकतात. तर मोहिनी एकादशीच्या पारायणाची वेळ सकाळी 05.40 ते 08.19 च्या दरम्यान राहणार आहे.

हेही वाचा - Guru Pushya Yoga 2023 : कधी आहे गुरू पुष्यामृत योग, काय आहे महत्व

Last Updated : May 1, 2023, 9:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details