महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Makeup Tips : 'या' टिप्सच्या मदतीने करा स्वतःचा मेकअप, जाणून घ्या.... - टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग

Makeup Tips : जर तुम्हाला मेकअप कसा करायचा हे ठाऊक नसेल किंवा प्रत्येक वेळी कोणाची तरी मदत घ्यावी लागत असेल तर या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा नैसर्गिक मेकअप करू शकता. कसे ते जाणून घ्या.

Makeup Tips
मेकअप

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 5:14 PM IST

हैदराबाद : Makeup Tips मेकअप करणं हे फार कठीण काम नाही आणि त्यासाठी तुम्हाला नेहमी एक्स्पर्टची गरज नसते. जर तुम्हाला नैसर्गिक मेकअप कसा करायचा हे माहित असेल तर तुम्ही तुमचं सौंदर्य सहज वाढवू शकाल. कोणते मेकअप आयटम कधी आणि कोणत्या वेळी लावायचे, हे तुम्हाला माहीत असल्यास, तुम्ही तुमचा मेकअप अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल. चला तर मग जाणून घेऊ या मेकअप कसा करायचा आणि त्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून मेकअपमुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही आणि मेकअपशिवाय तुमची त्वचाही खराब दिसत नाही.

CTM फॉलो करा : CTM म्हणजे क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. CTM हा त्वचेच्या काळजीचा मूलभूत नियम आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि प्रत्येक मेकअप लुकसाठी, क्लिन्झरने सुरुवात करा, नंतर तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी टोनर वापरा, नंतर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावा.

प्राइमर लावा :तुम्हाला तुमच्या त्वचेवर थोडंसं प्राइमर लावावं लागेल. तुमचा टी-झोन, हनुवटी, कपाळ आणि तुमच्या चेहऱ्यावर प्राइमर लावा. आपल्या हातांनी वरच्या दिशेने किंवा गोलाकार अलगद आपल्या त्वचेवर लावा. त्यानंतर चेहऱ्यावर मेकअप सुरू करण्यापूर्वी एक मिनिट थांबा.

फाउंडेशन आणि कन्सीलर लावा : तुमच्या फाउंडेशनला कंसीलर लावा आणि चेहऱ्यावर लावा. संपूर्ण चेहऱ्याला पातळ थरात बेसिक टोनसह फाउंडेशन लावा. यावेळी लक्षात ठेवा की जास्त फाउंडेशन वापरू नका आणि ते तुमच्या नैसर्गिक त्वचेप्रमाणे ठेवा.

बल्श लावा :तुम्ही ते कोणत्याही चेहऱ्यावर वापरू शकता. तुमच्या गालावर क्रीम ब्लश लावा, लूज सिंथेटिक ब्रश वापरून गालाच्या हाडांपासून केसांच्या रेषेपर्यंत ब्लश लावा. नंतर, आपल्या डोळ्याच्या पापणीला बोटावर जे उरले आहे ते वापरा.

शेवटी काजल, आयलायनर, मस्करा आणि लिपस्टिक लावा :आता मेकअपच्या शेवटी आयलायनर लावा आणि नंतर डोळ्याच्या खालच्या भागावर काजल लावा. यानंतर जर तुम्हाला मस्करा लावावासा वाटत असेल तर तो लावा. यानंतर तुमच्या आवडत्या शेडची लिपस्टिक लावा. लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लायनर लावा जेणेकरून तुमच्या ओठांना ग्लो येईल.

हेही वाचा :

  1. Personality Development Tips : बोल्ड व्यक्तिमत्व असलेल्या लोकांमध्ये असतात 'या' गोष्टी...
  2. Yoga Tips : योगासने करण्यापूर्वी पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या काय आहेत नियम...
  3. Skin Care Tips : प्रवासात त्वचा खराब होतेय? नक्की फॉलो करा या टिप्स...

ABOUT THE AUTHOR

...view details