महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Mahavir Jayanti 2023: महावीर जयंती; जाणून घ्या, भगवान महावीरांची तत्त्वे आणि महत्त्व - महावीर जयंती

दरवर्षी चैत्र महिन्यातील त्रयोदशीला शुक्ल पक्षाच्या 13 तारखेला म्हणजे 4 एप्रिलला महावीर जयंती साजरी केली जाते. हा दिवस जैन धर्माच्या संस्थापकाची जयंती म्हणून साजरा केला जातो. हा जैन धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. जैन धर्मीय लोक मोठ्या थाटामाटात हा सण साजरा करतात.

Mahavir Jayanti 2023
महावीर जयंती 2023

By

Published : Apr 3, 2023, 8:07 AM IST

Updated : Apr 4, 2023, 6:36 AM IST

दिल्ली :आज महावीर जयंती आहे.महावीर जयंती जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांना समर्पित आहे. महावीर जयंती ही भगवान महावीर यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, महावीर जयंती चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशीला चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी साजरी केली जाते. भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली होती.

महावीर जयंतीचे महत्त्व:जैन धर्माच्या संस्थापकाने अहिंसा आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याचा उपदेश केला आहे. माणसाने सर्व प्राणिमात्रांचा आदर व सन्मान केला पाहिजे. जैन धर्माचे संस्थापक महावीर यांचा जन्म अशा युगात झाला, जेव्हा हिंसाचार, पशुबळी, जातीय भेदभाव शिगेला पोहोचला होता. सत्य आणि अहिंसा या विशेष शिकवणुकीतून त्यांनी जगाला योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले सत्य आणि अहिंसा हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, व्यक्तीला आध्यात्मिक शांती आणि मोक्ष प्राप्त होतो.

भगवान महावीरांची तत्त्वे : भगवान महावीरांनी मानवाच्या उन्नतीसाठी पाच मुख्य तत्त्वे सांगितली होती. जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य या पंचशील तत्त्वांविषयी सांगितले. ही पाच तत्त्वे कोणत्याही माणसाला सुखी जीवनाकडे नेणारी आहेत. तर जैन धर्माच्या तज्ज्ञांच्या मते भगवान महावीरांचा जन्म बिहारमधील कुंडलपूरच्या राजघराण्यात ईसापूर्व 599 मध्ये झाला होता.

12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर ज्ञान प्राप्त झाले: भगवान महावीर यांनी वयाच्या 30 व्या वर्षी सांसारिक मोह आणि राजवैभवाचा त्याग केला होता. आत्मकल्याण आणि जगाच्या कल्याणासाठी निवृत्त झाले. 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान महावीरांना ज्ञानप्राप्ती झाली, असेही मानले जाते. वयाच्या ७२ व्या वर्षी पावपुरी येथे त्यांना मोक्ष प्राप्त झाला. त्यांनी माणसाला योग्य मार्ग दाखविण्याचे काम केले.

हेही वाचा:Global Warming जागतिक तापमानवाढीमुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही संभाव्य आपत्तींचा धोका

Last Updated : Apr 4, 2023, 6:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details