महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

सागरी जिवांची, साहसी खेळांची आवड आहे? सेशेल्समधील 'ही' ठिकाणे तुम्हाला भुरळ घालतील

सेशल्स निसर्गाची अशी भेट आहे जिकडे सर्वीकडे तुम्हाला निसर्गाचे सुदर दृश्य पाहायला मिळेल, ज्याचे चित्रिकरण करणे कठीण आहे. सेशल्स केवळ आपल्या समुद्रकिनाऱ्यांसाठीच प्रसिद्ध नसून तेथे निसर्गाचे अनेक आश्चर्यकारक चमत्कारही दडलेले आहेत.

Seychelles information etv bharat
सेशल्स सागरी जीव

By

Published : Sep 4, 2021, 6:10 PM IST

सेशल्स निसर्गाची अशी भेट आहे जिकडे सर्वीकडे तुम्हाला निसर्गाचे सुदर दृश्य पाहायला मिळेल, ज्याचे चित्रिकरण करणे कठीण आहे. सेशल्स केवळ आपल्या समुद्रकिनाऱ्यांसाठीच प्रसिद्ध नसून तेथे निसर्गाचे अनेक आश्चर्यकारक चमत्कारही दडलेले आहेत. 115 बेटांसह सेशल्स बेटसमूह पर्यटकांना स्वर्गाचे अनुभव करवून देतो.

सेशेल्समध्ये तुम्हाला वेगवेगळे अनुभव मिळेल, जसे येथील वन्यजीव आणि वृक्ष संपदा, त्याचबरोबर समुद्रावरील आणि आतील दृश्य अकल्पनीय आहेत. 250 पक्षी आणि 2 हजार प्रकारच्या वनस्पती येथील हिरव्यागार पर्जन्यवनाला सुशोभित करतात. 'ब्लॅक पॅरेट' हा येथील राष्ट्रीय पक्षी आहे. तो पृथ्वीवरील दुर्मिळ पक्षी असल्याचे मानले जाते. या पोपटाला एक जाणकारच ओळखू शकतो. प्रेस्लीन बेटाच्या व्हॅली डे माई नैसर्गिक संरक्षण, जे एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ देखील आहे, तेथे गेल्यास तुम्ही हा पोपट पाहू शकता. याव्यतिरिक्त जगात कोको-डी-मेर झाडाची सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आहे. या झाडाला वैश्विक महत्व आहे. त्याच्या बिया खूप मोठ्या असतात.

..या ठिकाणी मोठ्या कासवाचे दर्शन होऊ शकते

क्यूरीयूज बेटावर (Curieuse Island) तुम्ही जगातील सर्वात मोठ्या कासावांना पाहू शकता. हे कासव तेथे मुक्तसंचार करताना तुम्हाला दिसून येतील. क्यूरीयूज बेट हे एक संरक्षित जंगल असून तेथे ग्रॅनाइट समुद्रकिनारा आहे, जे येथील प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवासासारखे आहे.

या समुद्री जगात अजून आनंद घेण्यासाठी तुम्ही येथील ईडन बेटावरून अर्ध पाणबुडीची सवारी देखील करू शकता. तुम्ही सेशेल्सचे विश्व प्रसिद्ध पाण्याखालील खडक (Reef) देखील पाहू शकता, त्याचबरोबर समुद्री जिवांसोबत तुम्ही काही वेळ देखील घालवू शकता. येथे तुम्ही रंगीबेरंगी समुद्री शेवाळ, प्रवाळ (Coral) आणि दूरवर पोहणाऱ्या माशांचा झुंड देखील पाहू शकता. ही सुंदर दृश्ये तुम्हाला उत्साहित करून सोडतील.

तुम्हाला साहसी खेळ आवडत असेल तर....

जर तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट अवडत असेल तर सेशेल्स तुम्हाला निराश करणार नाही. येथे तुम्ही ट्रेकवर जाऊ शकता, जे खूप आव्हानात्मक आहे. माहेमध्ये स्थित मोर्ने सेशेलॉइस नॅशनल पार्क, हे सर्वात मोठे उद्यान मोर्ने सेशेलॉइस पर्वत रांगेत पसरले आहे. येथे तुम्हाला पॅनोरामा दृश्य पाहायला मिळेल, जो एक वेगळाच अनुभव देईल. जेव्हा तुम्ही तुमचा ट्रेक संपवाल तेव्हा भेट म्हणून तुम्हाला राजधानी व्हिक्टोरियाची अप्रतिम आणि सुंदर दृश्ये पाहायला मिळतील, जी केवळ अकल्पनीयच नव्हे तर, अद्वितीय देखील आहेत.

निसर्गाच्या सानिध्यात आराम करण्यासाठी 'हे' बेट

ला डिग्यू हे बेटसमुहातील चौथे सर्वात मोठे बेट आहे. ज्या लोकांना निसर्गाच्या सानिध्यात आराम करायचे आहे, त्यांच्यासाठी हे बेट एक सुंदर स्थळ आहे. बेटावर सायकल आणि ऑक्सकार्टने फेरफटका मारण्याव्यतिरिक्त येथील डायव्हिंग आणि रॉक क्लाइम्बिंग देखील लोकप्रिय आहे. मात्र, ला पास टू ग्रँड अन्से ट्रेल हा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, विशेषत: अशांसाठी ज्यांना धोकादायक ट्रेक आवडतात. हा ट्रेक फ्रेंच वसाहतीतील घरे, वुडलँड्स, दलदल असलेल्या प्रदेशातून होत जातो, जो शेवटी ग्रँड अन्से समुद्रकिनाऱ्याकडे जातो.

सेशेल्सच्या संस्कृतीची होईल ओळख

येथील जीवंत संस्कृतीवर अनेक इतर संस्कृतींचा प्रभाव आहे. माहे येथे तुम्ही बाजारात फिरू शकता किंवा या क्षेत्रातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी क्रियोल महोत्सव एक पर्वणीच आहे. इतिहासाची आवड असणारे माहे येथील बाई लाजारेच्या विचित्र शहराला पसंती देतील. 18 व्या शतकातील नव-गॉथिक बाई लजारे चर्च हे बघण्यासारखे आहे. हे ठिकाण बाई लजारेचे सुंदर आणि शांत दृश्य दाखवते. येथील राष्ट्रीय संग्रहालय इतिहास समजण्यासाठी मदत करते.

सेशेल्सच्या खाद्यपदार्थांवर अनेक संस्कृतींचा प्रभाव

सेशेल्स हे बेट समूह आहे, त्यामुळे येथील खाद्यपदार्थांवर अनेक संस्कृतींचा प्रभाव आहे. जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर, जार्डिन दू रोईच्या ऐतिहासिक स्थळांची यात्रा करत तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर, तुम्ही सेचेलॉइस जीवनशैलीचा आनंदही घेऊ शकता.

सेशेल्स अप्रतिम सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी ओळखले जाते. येथे प्रकृतीने रंगांची मृक्त उधळण केल्याचे तुम्हाला वाटेल. निळा अथांग महासागर आणि केशरी आकाश हे तुमच्या आतील चित्रकाराला बाहेर आणण्यास प्रवृत्त करेल. त्याचबरोबर, तुम्ही येथील क्रियोल आहार ज्यात, नारळ, आंबे आणि ब्रेडफ्रूट, मासे, शेलफिश आणि ताज्या भाज्यांचा समावेश आहे, त्याचा देखील आस्वाद घेऊ शकता.

सेशेल्समधील हिरवळ, येथील सुंदर स्थाने तुम्हाला धावपळीच्या जीवनापासून थोडी विश्रांती देऊ शकतात. येथील पर्वत, पार्क, ट्रेकींग तुमचा आनंद द्विगुणित करू शकतात. साहसी सफरीचा अनुभव घेण्यासाठी, त्याचबरोबर येथील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सेशेल्स एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा -सुडौल शरीरासाठी किती आणि कोणता व्यायाम करावा? वाचा...

ABOUT THE AUTHOR

...view details