हैदराबाद : जेवणात थोडी खट्टीमिठ्ठी चव आणण्यासाठी लिंबू वापरला जातो. ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी लिंबू पाणी पिणे अनेकांना आवडते. लिंबू पाण्यानं दिवसाची सुरुवात केली तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे अनेक आजारांपासून सुटका होण्यासही मदत होते.
Lemon water benefits : अनोशा पोटी लिंबू पाणी पिणे कधीही चांगले; जाणून घ्या काय आहेत फायदे... - लिंबू पाणी
उत्तम आरोग्यासाठी लिंबू पाणी पिणे हे नेहमीच फायदेशीर मानले जाते. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक लिंबू पाणी पितात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम देखील लिंबू पाणी करते. लिंबू पाणी पिल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. याबद्दल अधिक जाणून घ्या...
लिंबू पाणी पिणे कधीही चांगले
Published : Aug 30, 2023, 2:54 PM IST
शरीर हायड्रेटेड राहणे महत्वाचे : शरीर हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे. निर्जलीकरणामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि थकवा येऊ शकतो. लिंबूपाणी पिल्याने हायड्रेशन चांगले राहते. पाण्यात लिंबू मिसळल्याने पाण्याची चव वाढते. त्यात अनेक पोषक घटकही मिसळले जातात. सकाळी लिंबू पाणी पिल्याने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते. तुम्ही लिंबू थंड किंवा गरम पाण्यात मिसळून पिऊ शकता.
- व्हिटॅमिन सी ची कमतरता भरून काढते : लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्वाचे असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत झाल्यामुळे रोगांचा धोका काही प्रमाणात कमी होतो.
- त्वचा चमकदार बनते : लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. लिंबू पाणी पिल्याने त्वचा चांगली राहते. व्हिटॅमिन सी शरीराला कोलेजन तयार करण्यास मदत करते. लिंबू पाणी पिल्याने त्वचा अधिक काळ तरुण दिसण्यास मदत होते.
- पचनक्रिया सुधारते : सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहते. लिंबामध्ये असलेले पॉलीफेनॉल आतडे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. जर तुम्हाला पचनाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. त्यामुळे आतड्यांचे आरोग्यही सुधारते.
- टाळू शकता किडनी स्टोन :लिंबाच्या रसामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड कॅल्शियम ऑक्सलेटच्या निर्मितीमुळे किडनी स्टोन रोखण्यास मदत करते. तसेच, मूत्रपिंडातील दगड शरीरातून बाहेर काढण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर भरपूर लिंबू पाणी प्या.
हेही वाचा :