हैदराबाद :हिवाळा हा कडाक्याच्या थंडीचा आणि वजन वाढण्याचा काळ असतो. या ऋतूमध्ये आपल्याला अनेकदा जास्त भूक लागते. त्यामुळे दिवसभरात काहीतरी खावेसे वाटते याव्यतिरिक्त, थंडीमुळे कमी शारीरिक हालचाली होतात. त्यातून वजन वाढते. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात वजन नियंत्रित करणे खूप कठीण आहे. थंडीत कमी पाणी पिल्यानं लोकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो.
हिवाळ्यात तुमचे वजन नियंत्रित करण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट करण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. रिकाम्यापोटी मध, लिंबू पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे केवळ वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी नाही. तर त्याचे इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत. याची फार कमी लोकांना माहिती आहे.
हिवाळ्यात लिंबू मध पाणी प्या :
- भूक नियंत्रणात राहते : रिकाम्यापोटी मध आणि लिंबू पाणी प्यायल्याने भूक नियंत्रित राहते. भुकेवर नियंत्रण राहिल्यानं तुम्ही दिवसभर जास्त खाणे टाळता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
- पचनक्रिया सुधारते :लिंबाचा रस पाचन एंझाइमचे उत्पादन वाढविण्यास मदत करतो. त्यातून पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यास मदत करते.
- रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं : साखरेच्या तुलनेत मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी लिंबाचा रस मर्यादित प्रमाणात घ्यावा. लिंबूमध्ये मध मिसळल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे साखरयुक्त पदार्थांची भूकही कमी होईल
- चयापचय दर वाढवते : मध आणि लिंबू यांचे मिश्रण तुमचा चयापचय दर वाढवते. ते तुमच्या शरीराला दिवसभरात मोठ्या प्रमाणात कॅलरीज कमी करण्यास मदत करते.
- शरीराला हायड्रेट ठेवते :वजन कमी करण्यासाठी हायड्रेटेड राहणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तुमचे शरीर कधीही निर्जलीकरण होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात मध लिंबाचा रस समाविष्ट करू शकता. शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते
- हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते :लिंबू आणि पाणी हे उत्कृष्ट डिटॉक्सिफायिंग पेय मानले जाते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.
हेही वाचा :
- गुलाबी पेरू आरोग्यासाठी फायदेशीर, हिवाळ्यात तो खाल्ल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
- सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होतोय; 'या' 5 उपायांनी मिळवा आराम
- चहा बनवताना आणि पिताना करू नका 'या' चुका; अन्यथा आरोग्याची होऊ शकते हानिकारक