महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Kojagari Poornima 2023 : कोजागरी पौर्णिमेला घरी येणार लक्ष्मी; जाणून घ्या पुजेची वेळ - शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र

Kojagari Poornima 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा तिथी असते आणि वर्षभरात १२ पौर्णिमा तिथी असतात. तसेच अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ती कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.

Kojagari Poornima 2023
कोजागरी पौर्णिमा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 1:45 AM IST

हैदराबाद : Kojagari Poornima 2023 अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. शरद पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा, रास पौर्णिमा आणि पूनम पौर्णिमा या नावांनीही ओळखली जाते. शरद पौर्णिमा ही वर्षातील सर्व पौर्णिमांमध्ये सर्वोत्तम मानली जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या 16 चरणांनी पूर्ण असतो. धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ती त्या घरांमध्ये जाते जिथे प्रकाश, स्वच्छता आणि घरांचे दरवाजे तिच्या स्वागतासाठी उघडे असतात. जाणून घेऊया कोजागरी पौर्णिमा कधी आहे? कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता?

या वर्षी कोजागरी पौर्णिमा 2023 कधी आहे ?आश्विन पौर्णिमा तिथी शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 04:17 वाजता सुरू होईल. ही तारीख २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०१:५३ वाजता संपेल. यावर्षी शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी उदयतिथी आणि पौर्णिमेतील चंद्रोदयाच्या वेळेनुसार साजरी केली जाईल.

कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेची पद्धत : पौराणिक कथेनुसार, कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा अवतार झाला होता. असं मानलं जातं की दिवाळीच्या आधी या दिवशी देवी लक्ष्मी रात्रीच्या प्रवासाला निघते. या दिवशी घराची स्वच्छता करणं आवश्यक आहे, कारण देवी लक्ष्मी फक्त स्वच्छ आणि नीटनेटक्या घरात प्रवेश करते. यासोबतच चंद्रोदयानंतर रात्री कोजागिरी पौर्णिमेची पूजा करण्याची परंपरा आहे. या रात्री अष्टलक्ष्मीची पूजा करून तिला खीर अर्पण केली जाते. खीर एका डब्यात स्वच्छ कापडाने बांधून रात्रभर चांदण्यात ठेवावी. सकाळी प्रसाद म्हणून घेतल्यानं घरात समृद्धी येते.

काय आहे चंद्रोदयाची वेळ : शरद पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 05:20 मिनिटांनी होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेला का पितात उकळलेलं दूध ? शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्यानं चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात. त्यावर अमृताचा प्रभाव होतो, असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला प्रसाद म्हणून दूध किंवा खीर दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात खीर ठेवून तिचं सेवन केल्यानं लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असं मानलं जातं.

हेही वाचा :

  1. Dryfruits benefits in winter : हिवाळ्यात फायदेशीर ठरतात ड्रायफ्रुट्स; जाणून घ्या फायदे
  2. Natural Cough Remedie : थंडीच्या दिवसात तुम्हालाही झाला सर्दी खोकला तर करा 'हे' उपाय...
  3. Juice of Papaya leaf : रोज प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या फायदे

ABOUT THE AUTHOR

...view details