महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Health Benefits of Banana : जाणून घ्या केळी खाण्याचे अनोखे फायदे, अनेक समस्या होतील दूर - Banana

भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. चला तर जाणून घेवूया केळीचे अनोखे फायदे (Benefits of Banana).

Benefits of Banana
केळीचे अनोखे फायदे

By

Published : Oct 30, 2022, 7:46 PM IST

आपल्या आसपास जी केळी होतात. त्या केळ्यांचे (banana) सेवन केल्यास अनेक समस्येवर मात करणे शक्य आहे. केळीचे विविध प्रकार (Types of Banana) आहे. जसे की, वेलची केळी, राजेळी केळी, हिरव्या सालीची केळी. तेव्हा आपल्या नेहमीच्या फळवाल्याला हिरव्या सालीची केळी आणायला प्रोत्साहित करा. आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते. तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे आणि उत्तमरित्या उपयोग करते. चरबीत रूपांतर होऊ देत नाही. केळी हे मुळात ‘प्रिबायोटिक’ असल्यामुळे आपल्या आतड्याच्या स्वास्थ्याला जपते. दिवाळीच्या दिवसात फराळाचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे होणारे त्रास, उदा. अपचन, ॲसिडिटी यांच्यापासून वाचवते. तेव्हा फराळ कराच पण केळी खायला विसरू नका.

पोषक तत्वांचा खजिना असतो: अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळीचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो. केळी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करते. जुलाबचा त्रास होत असल्यास केळी खाणे फायदेशीर (Benefits of Banana)ठरेल. केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते. केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यामध्ये पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

अधिक फायदे होतात: दिवसाची सुरुवात तर केळ्याने करावी. केळी दिवसभरात कधीही खाता येते. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. दिवसभरात त्रास देणारी ॲसिडिटी, डोकेदुखी, अपचन आणि ब्लोटिंगपासून आपल्याला केळी वाचवते. दिवसाची सुरुवात केळीने केल्याने दिवसभरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो. ह्रदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळी खाल्लीचं पाहिजे. केळीत असलेला खनिजांचा साठा ( minerals) ह्रदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळी हे एक वरदान आहे. मधुमेहींवर नेहमीच सफरचंदांचा मारा केला जातो. जी साखर सफरचंदात आहे तीच केळ्यातही आहे. तिला ‘फ्रुक्टोज’ म्हणतात. ही फ्रुक्टोज रक्तातील साखर आटोक्यात आणण्यास मदत करते.

उर्जा मिळते: केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत.

ABOUT THE AUTHOR

...view details