नवी दिल्ली : व्हॅलेंटाईन विक दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. चॉकलेट डे आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या जवळच्या मित्रांना किंवा आपल्या पार्टनरला चॉकलेट देतो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये या दिवशी, सर्व जोडपी त्यांच्या जोडीदाराला त्यांचे आवडते चॉकलेट देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, चॉकलेटचा इतिहास सुमारे 4 हजार वर्षांचा आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच चॉकलेटचे झाड दिसले. मेक्सिकोतील माया संस्कृतीतील लोक धार्मिक कार्यक्रमांसाठी चॉकलेटचा वापर करायचे. वधू-वर एकमेकांना चॉकलेट द्यायचे. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे.
चॉकलेटचा इतिहास : चॉकलेट हा स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. पूर्वी चॉकलेट चवीला कडू असायचे असे म्हणतात. अमेरिकेत कोकोच्या बिया बारीक करून त्यात काही मसाले आणि मिरच्या घालून कडू चॉकलेट बनवले जायचे. चॉकलेटमध्ये वापरण्यात येणारे कोकोचे झाड 2000 वर्षांपूर्वी अमेरिकेतील पावसाच्या जंगलात सापडले होते. या झाडाच्या बीन्समध्ये असलेल्या बियांपासून चॉकलेट बनवले जाते. तसेच, चॉकलेटची सुरुवात मध्य अमेरिका आणि मेक्सिकोच्या लोकांनी केली होती, असे सांगितले जाते. पण स्पेनमध्ये चॉकलेट सर्वाधिक प्रसिद्ध झाले. पूर्वी चॉकलेट ही खायची गोष्ट नसून पिण्याची गोष्ट होती, असे म्हणतात.