नवी दिल्ली : स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अनेक शूरविरांनी आपले बलिदान दिले आहे. इंग्रजांनी भारताच्या एकात्मतेला धक्का पोहोचवून संपूर्ण देशात हिंदू आणि मुस्लिमांना वेगवेगळे केले. इंग्रजांच्या या डावपेचाचा परिणाम होऊन नागरिकांमध्ये कट्टरतावाद फोफावू लागला. त्यामुळे स्वातंत्र्य आणि देश यांच्यातील या दरीमध्ये धर्मांमधील फरक महत्त्वाचा ठरला. याविरोधात लढत असताना गणेश शंकर विद्यार्थी यांना वीरमरण आले. गणेश शंकर विद्यार्थी यांनी कानपुरातील दंगली थांबवताना २५ मार्चला आपले बलिदान दिले. जाणून घेऊया त्यांच्याबाबतची महत्वाची माहिती.
कोण होते गणेश शंकर विद्यार्थी :गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म मध्यप्रदेशातील फतेहपूर येथे २६ ऑक्टोबर १८९० मध्ये झाला. त्यांचे वडील जयनारायण हे व्हरनाकुलर शाळेवर शिक्षक होते. गणेश शंकर विद्यार्थी यांचे प्राथमिक शिक्षण अशोकनगर येथून १९०७ मध्ये पूर्ण झाले. मात्र त्यानंतर त्यांनी आपले शिक्षण थांबवून करंसी कार्यालयात लिपिकाची नोकरी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आपल्या वयाच्या १६ वर्षी कानपूर हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी सुरू केली. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच आपले पहिले पुस्तक लिहिले. त्यानंतर त्यांचे चंद्रप्रकाशवती यांच्याशी १९०९ मध्ये लग्न झाले.
गणेश शंकर असे बनले विद्यार्थी :गणेश शंकर विद्यार्थी यांनी शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर हिंदू आणि उर्दू साप्ताहिकात पत्रकारिता सुरू केली. यात स्वराज्य, सरस्वती आदी साप्ताहिकांचा समावेश आहे. यानंतर त्यांना महावीर प्रसाद द्विवेदी यांनी आपल्या पत्रकात उपसंपादक म्हणून नोकरी देण्याचे ठरवले. त्यामुळे गणेश शंकर विद्यार्थी यांनी त्यांच्या विचाराने प्रभावित होत महावीर प्रसाद द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता सुरू केली. पत्रकारिता सुरू असतानाच गणेश शंकर यांनी आपले अडनाव विद्यार्थी असे केले. त्यांनी आपल्या गणेश शंकर विद्यार्थी या नावानेच लिखाण करत स्वातंत्र्य चळवळीत काम केले.
देशात धार्मिक दंगली झाल्या सुरू :इंग्रजांनी भारतीयांमध्ये फूट पाडल्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा लढा इंग्रजांमध्ये नाही, तर धर्मांमध्ये सुरू झाला होता. त्याचा फायदा इंग्रजांनाही मिळू लागला. त्यांच्या विरोधातील चळवळी कमी झाल्या. देशातील अनेक बुद्धिजीवी चेहऱ्यांनी त्या काळातील संवेदनशीलता अनुभवली. यामध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि नेहरू यांसारख्या नावांचा समावेश होता. यातच शांततेचा झेंडा हाती धरुन दंगलीच्या रस्त्यावरून जात, इंग्रजांच्या विरोधात देशवासीयांना जागे करण्यासाठी स्वतःचे बलिदान देणारे निर्भीड पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांचाही समावेश होता.
कानपूरभर पसरल्या दंगली :इंग्रजांनी 1931 साली सुरू केलेल्या आगीत संपूर्ण भारत देश जळत होता. यामध्ये कानपूरचाही समावेश होता. कानपूरभर दंगली पसरल्या होत्या. धर्माच्या नावाखाली लोक एकमेकांना मारत होते. हा सर्व प्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांच्यासमोर घडत होता. त्यामुळे त्यांचे मन विचलित झाले. अशा स्थितीत गणेश शंकर विद्यार्थी यांनी दंगल रोखण्यासाठी बाहेर पडून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे ठरवले. अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. दिवसभर दंगलग्रस्त भागात फिरून निरपराधांचे प्राण वाचवत राहिले. त्यावेळी पत्रकारितेची नव्हे तर माणुसकीची गरज होती.
अखेर दंगली थांबवण्यासाठी दिले बलिदान :दंगल थांबवण्यासाठी गणेश शंकर विद्यार्थी हे दंगलग्रस्त भागात पोहोचले. पण काही वेळातच त्यांना दंगलखोरांच्या टोळक्याने अडवले. या सर्व दंगलखोरांना गणेश शंकर विद्यार्थी यांच्याबाबत माहिती नव्हते. त्यामुळे दंगलखोर त्यांच्याकडे तिरस्काराने पाहू लागले. यावेळी जमावातील कोणीतरी विद्यार्थी यांच्या अंगात भाला घुसवला, त्यांच्या डोक्यात लाठ्याही मारल्या. त्यामुळे क्षणार्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेलेले गणेश शंकर विद्यार्थी हे हुतात्मा झाले. या घटनेनंतर काही दिवसांनी 25 मार्च 1931 रोजी त्यांचा मृतदेह रुग्णालयात अनेक मृतदेहांच्या ढिगाऱ्यात पडलेला आढळून आला. शांतता प्रस्थापीत करण्यासाठी गेलेल्या शांततेच्या दूताचा असा अखेर झाला. आज त्यांचा स्मृतीदिन, त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतकडून विनम्र अभिवादन.
हेही वाचा - World Tuberculosis Day 2023 : जागतिक आरोग्य संघटनेचा क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचा निर्धार, जाणून घ्या किती होतात टीबीमुळे मृत्यू