ओहिओ : कठीण प्रश्न सोडवण्यासाठी लहान मुलेही मोठ्या माणसांप्रमाणेच मेंदूचे नेटवर्क वापरत असल्याचे उघड झाले आहे. लहान मुले गणितीय आकडेमोड आणि कठीण प्रश्न मोठ्या माणसा सारखेच सोडवत असल्याचे या रिपोर्टमधून दिसून आले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूची काम करण्याची क्षमता मोठ्या माणसांसारखीच असल्याचे ओहिओच्या स्टेट विद्यापीठाने केलेल्या रिपोर्टनुसार उघड झाले आहे.
चार ते 12 वर्षाच्या मुलांचा मेंदू करतो तल्लखपणे काम :ओहिओ स्टेट विद्यापीठाच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापक झेनेप सायगिन यांनी चार ते १२ वर्षाच्या मुलांवर एक अहवाल केला. या अहवालानुसार मोठ्या माणसांसारखाच चार ते १२ वर्षाच्या लहान मुलाचा मेंदू तल्लखपणे काम करत असल्याचे उघड झाले. प्राध्यापक सेगींज यांनी केलेल्या या अहवालात मोठ्या माणसाचे आणि लहान मुलांची आकलन क्षमता सारखीच असते. लहान मुलांच्या मेंदूचे कार्य तल्लखपणे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी प्राध्यापक सेगींज यांनी लहान मुलांचा मेंदू एफएसआरआयमध्ये स्कॅन केला. कठीण प्रश्न सोडवताना या मुलांचा मेंदू स्कॅन करण्यात आल्यानंतर हे उघड झाल्याचे प्राध्यापक सेगींज यांनी स्पष्ट केले.
ब्रेन इंज्युरी झालेल्या रुग्णाला होणार अभ्यासाचा फायदा :लहान मुलांमध्ये मल्टीपल डिमांड नेटवर्कमध्ये वेगळे नेटवर्क आढळून आल्याची माहिती प्राध्यापक सेगींज यांनी स्पष्ट केली. त्यांच्या भाषेच्या नेटवर्कपेक्षाही हे वेगळे नेटवर्क असल्याचे सेगींज यांनी यावेळी सांगितले. हा अहवाल ओहिओ स्टेट विद्यापीठाच्या सायकॉलॉजी विभागाच्या विद्यार्थिनी इलाना स्केट्टीनीच्या नेतृत्वात करण्यात आला आहे. तर केली हिर्शी ही विद्यार्थीनी सुद्धा या अहवालाची सहलेखीका आहे. हा अहवाल जर्नल ऑफ न्युरोसायन्समध्ये प्रकाशीत करण्यात आला आहे. या अभ्यासाचा फायदा डोक्याला मार लागून मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांना होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. हा अभ्यास १८ ते ३८ वयोगटातील ४४ व्यक्तीवर आणि ४ ते १२ वयाच्या ३७ मुलांवर करण्यात आला आहे.
मुलांनी सोडवला कठीण टास्क : या अभ्यासादरम्यान लहान मुलांना आणि मोठ्या व्यक्तीने कठीण टास्क देण्यात आला होता. यावेळी ९ ते १२ चौरस असलेल्या ग्रिडची मालिका या मुलांना आणि मोठ्या व्यक्तींना देण्यात आली होती. यावेळी मोठ्या व्यक्तींना निळ्या रंगाची मालिका जुळवण्यास सांगण्यात आले होते. तशीच प्रक्रिया ४ ते १२ वर्षाच्या मुलांना करण्यास सांगण्यात आले होते. मात्र मोठ्या व्यक्तींनी ही मालिका लवकर जुळवली नाही. उलट मोठ्या व्यक्तींपेक्षाही लहान मुलांनी ग्रिड लवकर जुळवल्याचे यातून दिसून आले. त्यासारखाच भाषेचा टास्क यावेळी देण्यात आला होता. यावेळी लहान मुलांनी अगदी शांततेत सगळा टास्क अर्थपुर्ण रितीने ऐकूण घेतला. त्याच पद्धतीने मोठ्या व्यक्तींनीही ते ऐकले मात्र मल्टीपल डिमांड नेटवर्कमधील त्यांचा फॉर्म वेगळा असल्याचे दिसून आले. मुलांच्या भाषेचे ज्ञान विकसित व्हायचे असूनही मल्टीपल डिमांड नेटवर्क त्यांच्या भाषाज्ञानाच्या विकासाला सपोर्ट करत असल्याचेही यावेळी दिसून आल्याची माहिची प्राध्यापक सेगींज यांनी दिली.
हेही वाचा - Fatty Liver Disease Benefit From Fasting : नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमध्ये होतो उपवासाचा फायदा, संशोधनातून झाले सिद्ध