हैदराबाद :Kesar Tea Benefits केशर हा एक असा मसाला आहे, जो महाग असला तरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वृद्ध लोक गर्भधारणेदरम्यान ते खाण्याची शिफारस करतात. ते खाल्ल्यानं स्त्रीला तसेच गर्भाला अनेक फायदे होतात. केशरमध्ये सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, लोह आणि व्हिटॅमिन सी यांसारखं अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. याच्या सेवनानं शरीरातील अशक्तपणा तर दूर होतोच शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते. केशर मिठाई, दूध आणि खीरमध्ये घालून खाल्ले जाते. पण केशर चहा देखील बनवून सेवन करता येतो. हा चहा स्वादिष्ट असण्यासोबतच तो प्यायल्यानं शरीरातील अनेक आजार दूर होतात. हा चहा प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होईल आणि रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होईल.
हृदयासाठी चांगले :केशर चहा प्यायल्यानं हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका कमी होतो. हा चहा प्यायल्यानं हृदय निरोगी राहते आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते.
मासिक वेदना कमी करत : केशर चहा प्यायल्याने महिलांच्या मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. हा चहा प्यायल्याने पेटके, सूज, चिडचिड आणि थकवा यापासूनही आराम मिळतो. या चहामुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या कमी होतात.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत होतात :केशर चहा प्यायल्यानं रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. केशरमध्ये व्हिटॅमिन सी, बी, रिबोफ्लेविन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे मौसमी आजारांचा धोका कमी होतो. हा चहा प्यायल्यानं शरीरातील सूज दूर होते.
तणाव मुक्त : केशर चहा प्यायल्यानं तणाव दूर होण्यास मदत होते. हा चहा तणावाची लक्षणं कमी करून मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवतो. केशर चहा केवळ मूड सुधारत नाही तर शरीराची ऊर्जा पातळी देखील वाढवतं.