हैदराबाद : Karela Benefits अनेकांना कारलं खायला अजिबात आवडत नाही. त्याची चव कडू असल्यामुळे फार कमी लोक ही भाजी खातात. पण कारलं खाण्याचे असे अनेक फायदे आहेत, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, पोटॅशियम, आयर्न यांसारखे पोषक घटक आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. एवढेच नाही तर वजन कमी करण्यातही हे गुणकारी मानलं जाते. कारल्याचे इतरही अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया या भाजीचे आश्चर्यकारक फायदे.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त :कारल्याची चव कडू असली तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कॅरेन्टिन आणि पॉलीपेप्टाइड-पी रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारतात. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आपल्या आहारात कारल्याचा समावेश करावा.
वजन कमी करण्यास उपयुक्त :कारल्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि त्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते. हे खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही कारल्याचा समावेश जरूर करा.