महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Jeera Water Benefits : एक कप जिऱ्याचे पाणी तुम्हाला बनवेल तंदुरूस्त; सकाळी अनोशा पोटी पिल्याने होतात हे फायदे..... - cumin water

Jeera Water Benefits : जिऱ्याचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठीदेखील केला जातो. रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

Jeera Water Benefits
जिऱ्याचे पाणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 11:54 AM IST

हैदराबाद :Jeera Water Benefits किचनमध्ये असलेले मसाले जेवणाची चव वाढवण्यासाठीच उपयुक्त नाहीत, तर आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात असलेल्या जिऱ्याचे अनेक फायदे आहेत. जिऱ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे तुम्हाला आरोग्यविषयक छोट्या-मोठ्या समस्यांपासून दूर ठेवतात. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, कॉपर आणि मॅंगनीज असतं. सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, चला तर मग जाणून घेऊया जिरा पाणी कसं प्यावं.

वजन कमी करण्यासाठी : वजन कमी करण्यासाठी जिरे पाणी खूप उपयुक्त आहे. दररोज रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोट चांगलं राहतं आणि वजन कमी होतं. जिरे पाणी चयापचय सुधारतं. ज्यामुळे कॅलरी लवकर बर्न होतात.

रोगप्रतिकारशक्ती साठी उपयुक्त : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही जिरे पाणी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि के असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने अॅनिमियाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्याही दूर होतात.

वाईट कोलेस्ट्रॉलसाठी उपयुक्त : रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल शिरांमधून काढून टाकण्यासाठी जिरे पाणी फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी जिरे पाणी खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं आणि चांगले कोलेस्ट्रॉलदेखील वाढवतं. जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यावे.

त्वचेसाठी फायदेशीर : जिऱ्याचे पाणी पिणे त्वचेसाठीही फायदेशीर आहे. त्वचेचे मुरुम आणि ऍलर्जीपासून बचाव करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यावे. यामुळे त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि त्वचेवर चमक येते.

असे तयार करा पाणी :सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी पिण्यासाठी रात्रभर जिरे भिजवा. सकाळी गाळून त्याचे पाणी प्या. जिरे सकाळी पाण्यात उकळूनही सेवन करू शकता. अशा प्रकारे जिऱ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

हेही वाचा :

  1. Benefits of banana : वजन कमी करण्यापासून पचनक्रिया सुधारण्यापर्यंत फायदेशीर आहे केळी; जाणून घ्या काय आहेत फायदे...
  2. Benefits of Ladyfinger : भेंडीच्या भाजीसोबतच त्याचे पानी देखील आहे फायदेशीर; जाणून घ्या काय आहेत फायदे...
  3. Pineapple Benefits And Side Effects : रोगप्रतिकार शक्ती वाढवते अननस; जाणून घ्या फायदे आणि तोटे

ABOUT THE AUTHOR

...view details