महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांडला का म्हणतात भारतीय इतिहासातील काळा दिवस, वाचा सविस्तर - महात्मा गांधी

जुलमी इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 घडवून भारतीय नागरिकांची नृशंस हत्या केली होती. या हत्याकांडाने इंग्रजांनी जुलमाची परमोच्च सीमा गाठली होती.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Apr 12, 2023, 10:38 AM IST

हैदराबाद : जालियनवाला बाग हत्याकांड घडलेल्या दिवसाची नोंद भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून करण्यात आली आहे. या दिवशी जुलमी इंग्रजांनी हजारो निष्पाप भारतीयांचे जालियनवाला बागेत नृशंस हत्याकांड घडवले होते. रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी जमलेल्या या निष्पाप नागरिकांना जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणखी तिव्र झाला. मात्र या लढ्यासाठी जालियनवाला बागेत तब्बल 379 पेक्षा जास्त भारतीयांना 13 एप्रिल 1919 ला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

काय होते जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण : अमृतसरजवळील जालियनवाला बागेत हजारो भारतीय नागरिक शांतता सभेसाठी जमले होते. भारतात रौलेट काद्यामुळे भारतीय नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत होता. त्यामुळेच भारतभर आंदोलन पेटले होते. त्यातच इंग्जांनी अनेक जुलमी कारवाया सुरू केल्या होत्या. त्यामुळे आंदोलन चिघळतच होते. यासाठी भारतीय नागरिकांनी जालियनवाला बागेत शांतता सभा आयोजित केली होती. मात्र भारतीय नागरिक इंग्रजांना विरोध करण्यासाठी जमल्याचा आरोप करत इंग्रजांनी भारतीयांना जालियनवाला बागेत घेरले होते. इंग्रजांचा बंदी आदेश झुगारुन जालियनवाला बागेत भारतीय जमा झाल्याने जनरल डायर या अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे भारतीयांना जालियनवाला बागेत घेरुन इंग्रजांनी नृशंस हत्याकांड घडवले. यातील अनेक नागरिक चेंगराचेंगरी होऊनही ठार झाले. तर काहीजण जालिनवाला बागेत असलेल्या विहिरीत पडून ठार झाले. जुलमी जनरल डायरने तब्बल 379 नागरिकांचा बळी घेतला. मात्र हा फक्त सरकारी आकडा आहे, जालियनवाला बागेत तब्बल 1 हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर मदन मोहन मालविय यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने यावेळी तब्बल 500 नागरिकांचा बळी गेल्याचा अहवाल दिला आहे. जालिनवाला बागेत तब्बल 1650 राऊंड फायर करण्यात आले आहेत.

का होता रौलेट कायद्याला विरोध : ब्रिटीश सरकारने 10 मार्च 1919 ला इंग्रज अधिकाऱ्यांना सर्वाधिकार बहाल करणारा रौलेट कायदा संमत केला होता. या कायद्यानुसार जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना कोणत्याही भारतीयांना चौकशीशिवाय कारागृहात डांबता येत होते. कोणत्याही भारतीयांची चौकशी करण्याचे अधिकार इंग्रजांना मिळाले होते. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक आक्रमक झाले होते. महात्मा गांधी यांनी याविरोधात आंदोलन पुकारले होते. त्यांनी 7 मार्च 1919 ला सत्याग्रही नावाचा लेख लिहून आंदोलनाची रुपरेषा ठरवली होती. मात्र ब्रिटीश सरकारने महात्मा गांधी यांना पंजाबमध्ये प्रवेशबंदी करत त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली होती. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळले होते.

काय उमटले पडसाद :जालियनवाला बाग हत्याकांडात हजारो भारतीय नागरिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. मात्र त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणखी तिव्र झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जहाल गट यामुळे आणखीणच आक्रमक झाला.

हेही वाचा - Columbia Space Shuttle : कोलंबिया यानातून अंतराळवीर कल्पना चावलांनी केले होते शेवटचे उड्डाण, वाचा कोलंबिया यानाचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details