महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Jaggery Benefits : जेवणानंतर गूळ खाण्याचे अनेक फायदे; या आरोग्य समस्यांपासून आराम मिळेल

गूळ केवळ चवीसाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने सर्दी आणि कफाची समस्या दूर होत नाही. यासोबतच गूळ खाल्ल्याने शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. जेवणानंतर गुळाचा तुकडा खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेचे कार्य चांगले राहण्यास मदत होते.

Jaggery Benefits
जेवणानंतर गूळ खाण्याचे अनेक फायदे

By

Published : May 25, 2023, 2:41 PM IST

हैदराबाद : गुळ हा आपल्या देशात नैसर्गिक गोडवा म्हणून ओळखला जातो. आजकाल तरूणांमध्ये गूळ लोकप्रिय नसला तरी आजही वृद्ध लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात गुळाने करतात. किंबहुना उसाच्या रसापासून तयार होणारा हा गुळ पोषक तत्वांनी समृद्ध असतो. गुळामध्ये लोह ते कॅल्शियम सर्व असते.

गूळ खाणे शरीरासाठी फायदेशीर :बरेच लोक जेवणानंतर गूळ खातात. गुळाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीराला अनेक पोषक तत्वांनी समृद्ध ठेवते. यामुळेच लोकांना जेवणानंतर गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, त्याचे अतिसेवन देखील टाळावे.

जेवणानंतर गूळ खाण्याचे फायदे :

  • रक्तदाब नियंत्रण :गूळ खाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे आपला रक्तदाब नियंत्रित ठेवतो. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी गुळाचे सेवन हे अमृत मानले जाते.
  • तग धरण्याची क्षमता वाढवते : गुळातील पोषक घटक शरीराचा स्टॅमिना वाढवतात आणि आपल्याला सक्रिय ठेवतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थेट गूळ खाऊ शकता आणि जर तुम्हाला गूळ जास्त आवडत नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसामध्ये काळे मीठ मिसळून त्याचे सेवन करू शकता.
  • दृष्टी कमी होण्यासाठी गूळ फायदेशीर : ज्यांना डोळ्यांसंबंधी समस्या आहेत त्यांच्यासाठी गूळ खाणे खूप फायदेशीर आहे. डोळ्यांची कमकुवतपणा दूर करून दृष्टी सुधारण्यास प्रभावी आहे.
  • मजबूत हाडे : गुळात विविध पोषक तत्वांसह कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. विशेषत: वाढत्या वयातील मुलांमध्ये हाडे मजबूत होण्यासाठी गूळ खाणे खूप महत्वाचे आहे.
  • मेंदू निरोगी ठेवते : गूळ आपल्या मेंदूलाही निरोगी ठेवण्याचे काम करतो. गूळ रोज खाल्ल्यास मायग्रेनसारखे आजार दूर करण्याची ताकद असते. तसेच गूळ नियमित खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवा : तुम्हाला शरीरात ऊर्जा भरून ठेवायची असेल किंवा तुमची प्रतिकारशक्ती मजबूत हवी असेल तर जेवणानंतर गूळ खाण्यास सुरुवात करावी.
  • वजन कमी करण्यासाठी गूळ उपयुक्त : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही रोज गुळाचे सेवन करू शकता. जेवणानंतर गूळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते.
  • पचनसंस्था मजबूत करते : जर एखाद्या व्यक्तीला पचनक्रिया मजबूत करायची असेल तर त्याने रोज गुळाचे सेवन करावे. असे केल्याने गॅस, अपचन, मळमळ यासारख्या तक्रारी दूर होतात.

ABOUT THE AUTHOR

...view details