1. पहिल्या कोविड लाटेच्या तुलनेत आता रुग्ण संख्या वाढत आहे. भारत या लाटेवर कसे नियंत्रण ठेवणार ? दुसरी लाट किती गंभीर आहे ? काही जण म्हणतात, ही लाट दिवसाला ४ लाख रुग्ण इतकी वाढू शकते. तुम्हाला याबद्दल काय वाटते ?
भारतात दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. याचे कारण म्हणजे पहिल्या वेळेप्रमाणे आपण कोविडचे नियम पाळत नाही आहोत. आणि कोविड विषाणूचे बदललेले रूप हे पहिल्यापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. आपण ताबडतोब सगळ्यांचे लसीकरण करू शकत नाही. त्यामुळे ही लाट नियंत्रणात आणण्यासाठी एकच मार्ग, तो म्हणजे लोकांनी योग्य खबरदारी घेतल्याशिवाय एकमेकांच्या संपर्कात अजिबातच येऊ नये. याचा अर्थ म्हणजे चांगल्या प्रतीचा मास्क वापरणे, योग्य अंतर राखणे आणि घरात हवा खेळती ठेवणे, या गोष्टी करायला हव्यातच. ही दुसरी लाट गंभीर आहे. कारण मोठ्या प्रमाणात संसर्ग म्हणजे संसर्ग झालेल्या लोकांची टक्केवारी जरी कमी असली, तरी ते गंभीर आजारी पडतात आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर जास्त भार येऊ शकतो. आपण काहीच केले नाही तर ही रुग्ण संख्या वाढू शकते. पण सुदैवाने राज्यांनी आता निर्बंध सुरू केले आहेत. त्यामुळे मी अशी आशा करतो की, आपला ४ लाख आणि त्याहून जास्त रुग्ण संख्येच्या अंदाजाला खिळ बसू शकते.
2. आम्ही आपल्या लसीकरणाच्या क्षमतेचे कौतुक केले. पण शेवटी खूप मोठ्या अभावाला तोंड द्यावे लागले. अशी परिस्थिती का निर्माण झाली असावी ?
त्यामागे मुख्य तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे लस तयार करण्याची भारताची क्षमता मोठी असताना, लस तयार करण्याचे सर्व घटक भारतात उपलब्ध नाहीत. आपल्याला जागतिक पुरवठा साखळीत स्पर्धेत उतरावे लागते. आणि जगातला प्रत्येक लस उत्पादक जे उपलब्ध आहे ते खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरे म्हणजे आपल्या लस उत्पादकांनी लस कशी लवकर तयार होईल, मिळेल असे आशादायी चित्र उभे केले. पण अनेक कारणांमुळे ते शक्य झाले नाही आणि तुटवडा झाला. तिसरे कारण म्हणजे, लस उत्पादकांना लसीसाठी खात्रीदायक बाजारपेठ आहे याची कल्पना आहे. आता देशात किती पुरवठा करायचा आणि निर्यात किती करायची याची योजना आखणे आवश्यक आहे. ( आणि कंपन्यांना यासाठी पुरेशी रक्कम मिळू शकते, हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे ) जर असा काही अंदाज नसेल आणि सरकारने कमी वेळेत, कमी किंमतीत लसींसाठी आदेश दिले, तर लस उत्पादकांना चांगल्या प्रकारे काम करणे कठीण जाईल.
3. एक वर्ष या विषाणूवर खूप सखोल संशोधन झाले. आपण या विषाणूचे भविष्य वर्तवू शकतो का ? आपण जास्त मजबूत होऊ का ?
गेले वर्षभर आपण या विषाणूबद्दल बरेच काही शिकलो. आणि पुढे काय होऊ शकेल याचा अंदाज आपण लावू शकतो. इतर विषाणूंप्रमाणे, हा विषाणू देखील सहज पसरतो. पुन्हा याचा गुणाकार होतो. याचा अर्थ जास्तीत जास्त संसर्ग होणार. आणि लसीकरण जास्त झाले तर हा विषाणू प्रतिकार शक्तीपासून पळण्याचा प्रयत्न करणार. सुदैवाने विषाणूचे स्पाइक प्रोटिन हे संसर्गासाठी गरजेचे आहे आणि स्पाइक प्रोटिनमध्ये बदल होण्यास नक्कीच मर्यादा आहेत. विषाणूमध्ये होणारे बदल हे पुढच्या दोन वर्षांमध्ये दिसून येऊ शकतात. विषाणूत होणाऱ्या बदलांमुळे काही गंभीर आजार होऊ शकतात. या म्युटेशनलाही असे विषाणू लागतात जे चांगल्या प्रकारे पसरू शकतात. आणि जे विषाणू व्यक्तीला मारतात, त्यांचा गुणाकार होऊ शकत नाही. म्हणूनच भविष्यात गंभीर आजार वाढतील, असे वाटत नाही.
4. या दुसऱ्या लाटेसाठी देशभर लाॅकडाऊन लादण्याकडे तुम्ही कसे पाहता ? वैज्ञानिक निर्णयांमध्ये आर्थिक आणि राजकीय कारणांचा हस्तक्षेप कितपद योग्य आहे. ? तुम्हाला सरकार विषाणूवर नियंत्रण ठेवताना योग्य पावले उचलत आहे, असे वाटते ?
मला वाटते आपल्याला लाॅकडाऊनच्या पलीकडे जायला हवे. राज्यात कोरोनाचा फैलाव होण्यासाठी काय काय कारणीभूत आहे ? त्याचे आपण वर्गीकरण करू शकतो का ? बाजारपेठा आहेत का ? काॅलेजस किंवा शाळा किंवा सिनेमागृह किंवा सणवार किंवा निवडणुकीच्या प्रचारसभा कोरोना संसर्गाला कारणीभूत होत आहेत का ? यापैकी नक्की काय, हे पाहून सरकारने पुराव्यानिशी समोर आणले पाहिजे. ते थांबवले पाहिजे. हस्तक्षेप केला पाहिजे. लाॅकडाऊन हे बोथट हत्यार आहे. आपण सामाजिक आणि आर्थिक कृतींमध्ये अडथळे न आणता चांगले काम करू शकतो.
5. भारतातला हा विषाणू कसा आहे ? या नव्या अवताराची तीव्रता किती आहे ?
विषाणूच्या या नव्या रूपाचा भारतात पुरेसा अभ्यास झालेला नाही. पण या विषाणूचा संसर्ग मोठा आहे. हे अधिक गंभीर संक्रमण आहेत की नाही हे पाहणे बाकी आहे. हे स्पष्ट आहे की विषाणूचे वर्तन समजून घेण्यासाठी आम्हाला महामारीशास्त्र अजून जास्त प्रमाणात प्रयोगशाळेच्या अभ्यासाशी जोडण्याची आवश्यकता आहे. आम्ही तो वाढवण्याचा प्रयत्न करीत असलो तरी, आम्ही संक्रमणाची क्षमता समजण्यास आणि लसीमुळे होणारा बचाव कळण्यासाठी पद्धतींची स्थापना करण्यास धीमे आहोत.