हैदराबाद : आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा 2012 मध्ये साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे महिलांचं सक्षमीकरण करणं आणि त्यांना त्यांचे हक्क प्रदान करण्यात मदत करणं, जेणेकरून त्यांना जगभरातील आव्हानांना तोंड देता येईल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास :आंतरराष्ट्रीय स्तरावर बालिका दिन साजरा करण्याचा पहिला उपक्रम ‘प्लॅन इंटरनॅशनल’प्रकल्पाच्या रूपानं एका स्वयंसेवी संस्थेनं घेतला. या संस्थेनं 'कारण मी मुलगी आहे' असे अभियान सुरू केलं. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मोहीम वाढवण्यासाठी कॅनडा सरकारशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर कॅनडा सरकारनं हा प्रस्ताव ५५ व्या महासभेत ठेवला. शेवटी हा ठराव संयुक्त राष्ट्रांनी १९ डिसेंबर २०११ रोजी मंजूर केला आणि हा दिवस साजरा करण्यासाठी ११ ऑक्टोबरची निवड करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचं महत्त्व : मुलीला मार्गदर्शन आणि मूल्यं शिकवणं आवश्यक आहे ज्यामुळं तिचं आत्ममूल्य आणि सन्मान वाढेल. प्रत्येक मुलीची काळजी घेणे आणि तिच्यावर प्रेम करणं आवश्यक आहे. प्रत्येक मुलीला मुलभूत शिक्षण देणं महत्वाचं आहे, कारण शिक्षण हे एक स्त्रोत आहे ज्याद्वारे कोणीही त्यांचं जीवन लक्षणीय मार्गांनी बनवू शकतं. युनायटेड नेशन्स जनरल असेंबली द्वारे 2012 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली होती, ज्यात मुलींना भेडसावणाऱ्या समस्या जसे की शिक्षण, बालविवाह, गुणवत्ता, यौवन आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित सेवांमध्ये प्रवेश इ.
आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2023ची थीम : 'मुलींचे सक्षमीकरण: त्यांच्या संभाव्यतेला मुक्त करणे'या थीमवर आधारीत या वर्षीचाआंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाणार आहे.
हेही वाचा :
- Karela Benefits : रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यापासून ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यापर्यंत, जाणून घ्या कारल्याचे अगणित फायदे
- Egg Benefits For Hair : केसांना अंडी लावण्याचे आहेत अनेक फायदे; कोंडा दूर होण्यास होते मदत
- Viral Fever : व्हायरल तापापासून स्वत:ला वाचवायचंय? करा 'हे' घरगुती उपाय