दर महिन्याला 3 ते 4 दिवस मासिक पाळीवेळी प्रत्येक महिलांना अस्वस्थतेसह वेदना आणि तीव्र पोटदुखीचा सामान करावा लागतो. अस्वस्थता ही सॅनेटरी नॅपकिन्स वापरताना उद्भवणारा ओलेपणा आणि इतर समस्यांमुळे वाटते, विशेषकरू तेव्हा जेव्हा सॅनेटरी नॅपकिन्स बऱ्याच तासांपर्यंत वापरलेले असते. पूर्वी स्त्रिया पॅडऐवजी सुती कपडे वापरत असत, परंतु आता अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि स्वच्छ मासिक पाळीसाठी इतर अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
मध्यप्रदेशमधील देवास येथील प्रख्यात स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. प्राची माहेश्वरी स्पष्ट करतात की, मासिक पाळीवेळी स्वच्छतेच्या अभावामुळे जगातील मोठ्या संख्येने माहिला विविध आरोग्य स्थितींनी ग्रस्त आहेत. परंतु, जसजसे आपण प्रगती करत आहोत, महिला स्वच्छतेविषयी अधिक जागरूक झाल्या आहेत आणि आरामाची खात्री करणारी स्वच्छताविषयक उत्पादने वापरण्यास उत्सुक आहेत. मासिक पाळीवेळी कालावधी आणि रक्त प्रवाह हे विविध महिलांमध्ये भिन्न असू शकतात. प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्वच्छता उत्पादने (sanitary products) उपलब्ध आहेत. पुढे काही उत्पादनांची माहिती देण्यात आली आहे, जी महिलांना माहिती असणे आवश्यक आहे.
1) सॅनिटरी नॅपकिन
सॅनिटरी नॅपकिन हे मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये सर्वात अधिक वापरले जाणारे उत्पादन आहे. सहज उपलब्धता आणि वापरण्यात सुलभता, यामुळे ते अधिक श्रेयस्कर आहे. ते विविध आकांरांमध्ये देखील उपलब्ध आहेत आणि त्यास बॅग किंवा पर्समध्ये सहजपणे नेता येऊ शकते.
2) टॅम्पॉन
टॅम्पॉन हे मोट्रो शहरातील नोकरदार महिलांमध्ये अधिक प्रचलित आहे. योनीमध्ये टॅम्पॉन घालणे आवश्य असल्याने अनेक महिला ते वापरण्याबाबत थोडे संकोच करतात आणि चिंताग्रस्त होतात. एका वापरानंतर त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. जोरदार रक्तस्त्राव झाल्यास टॅम्पॉनचा वापर अधिक आरामदायक मानला जातो. ते रेग्यूलर, सुपर आणि सुपर प्लस साईझमध्ये येतो. पोहणे किंवा इतर तत्सम क्रियाकलापावेळी टॅम्पॉन वापरणे हा एक चांगला पर्याय आहे.