नवी दिल्ली : कोरोनानंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी आपल्या अनावश्यक खर्चावर आळा घातला आहे. ग्लोबल कंझ्युमर इनसाइट्स पल्स अहवालानुसार जगभरातील तब्बल 50 टक्के नागरिक वाढलेल्या खर्चामुळे चिंतीत आहेत. तर भारतीय नागरिकांमध्ये हे प्रमाण तब्बल 74 टक्के आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यात आर्थिक खर्च कमी करण्यावर भारतीय नागरिक जोर देत असल्याचेही या अहवालातून पुढे आहे. जून 2022 मधील शेवटच्या पल्स सर्वेक्षणानंतर सर्व श्रेणींमध्ये नियोजित खर्चात लक्षणीय घट झाली आहे.
भारतीय नागरिक खर्च कपातीत आहेत आघाडीवर :कोरोनामुळे भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या खर्चावर आळा घातला आहे. याबाबतची आकडेवारी ग्लोबल कंझ्युमर इनसाइट्स पल्स अहवालाने सादर केली. यात खर्चावर आळा घालण्यात भारतीय अग्रेसर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. किरकोळ ग्राहक संघटेनचे नेता रवी कपूर यांनी प्रत्यक्ष आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या खरेदीचा अनुभव ग्राहक घेतील. मात्र ब्रँड खर्च नागरिक कमी करू पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिक सध्या ब्रँडच्या वस्तू टाळून लोकल वस्तू घेण्याला प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लक्झरी, प्रीमियम उत्पादने, प्रवास आणि फॅशन उद्योगांना पुढील सहा महिन्यात ग्राहकांच्या खर्च कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. तर किराणा मालावरील खर्चात किमान घट होण्याची अपेक्षाही यात व्यक्त करण्यात आली आहे.