महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Reduce Belly Fat : पोटाची चरबी वाढलीये ? मग वाट कसली बघताय, करा 'या' हर्बल टीचे सेवन - Green Tea

तुम्ही जर पोटाची चरबी कमी करण्याचा विचार करत असाल किंवा गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही कुठल्याही पदार्थाचे सेवन करताना काळजी घ्यायला हवी. पोटाची चरबी वाढण्यास किंवा वजन वाढण्यास सध्या चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. (Reduce Belly Fat) जर आपण रोज एक खास हर्बल चहा (Hearbal tea) प्यायलो तर चरबी कमी करण्यास किंवा वजन कमी करणे सोपे होईल.

Herbal Tea
हर्बल टी

By

Published : Dec 7, 2022, 10:01 AM IST

हैदराबाद :अनेकदा इच्छा असूनही चुकीच्या आहाराच्या सवयी सोडू शकत नाही. तज्ज्ञाच्या मते, जर आपण रोज एक खास हर्बल चहा (Hearbal tea) प्यायलो तर चरबी कमी करण्यास किंवा वजन कमी करणे सोपे होईल आणि काही दिवसात आपल्याला पोटाचा घेर (Belly Fat) म्हणजेच बेली फॅट कमी होईल. ग्रीन टीमध्ये (Green Tea) असे अनेक हर्बल घटक आढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) मजबूत झाल्यामुळे शरीरातील रोगांचा धोका कमी होतो आणि आपले शरीर रोगमुक्त राहू शकते.

ग्रीन टी हा एक विशेष प्रकारचा हर्बल चहा आहे. जो वनस्पतीपासून तयार केला जातो. हे बाजारात सहज उपलब्ध आहे आणि ते घरी बनवू शकता. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास आणि वजन कमी होण्यास खूप मदत होते. चला तर जाणून घ्या ग्रीन टी पिण्याचे फायदे-

ग्रीन टी पिण्याचे फायदे- 1.ग्रीन टीचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोकाही कमी होतो. ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी ग्रीन टी खूप उपयुक्त मानली जाते. दररोज 2 ते 4 कप ग्रीन टीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट त्वचेमध्ये कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखू शकतात. तुम्ही खूप वेळा पाहिले असेल की, डाएट आणि वर्कआऊट करूनही वजन कमी होण्याचे नाव घेत नाही, अशा स्थितीत अनेक आरोग्य तज्ज्ञ ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात.

2.ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय ग्रीन टी मुरुम आणि वृद्धत्वाची प्रक्रिया देखील कमी करते. ग्रीन टीच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते. तसेच ग्रीन टी प्यायल्याने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तुमच्या शरीरातील सोडियम संतुलित ठेवण्याचे काम करते. पोटात गॅसमुळे फुगल्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत असेल, तर तुम्ही नियमितपणे ग्रीन टी प्यावा.

3.ग्रीन टी प्यायल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के सारखे आवश्यक पोषक घटक मिळतात. या हर्बल चहाच्या मदतीने हृदयविकार, किडनीचे आजार, ऍलर्जी, सांधेदुखी यांसारख्या आजारांवर मात करता येते, तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

4. तणाव कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन देखील उपयुक्त मानले जाते. ग्रीन टीमध्ये आढळणारे एल-थेनाइन तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही नेहमी तणावाखाली असाल तर सामान्य चहाऐवजी ग्रीन टी पिण्याची सवय लावा, याचे नियमित सेवन केल्यास मानसिक आरोग्यही सुधारू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details