हैदराबाद :सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. अलीकडच्या काळात देशाच्या विविध भागांत त्याची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. डेंग्यू हा डास चावल्यानं पसरणारा एक प्राणघातक रोग आहे. डेंग्यूमुळे शरीरात प्लेटलेट्सची कमतरता असते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळं हिमोग्लोबिनची पातळी देखील कमी होऊ शकते.
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो : जेव्हा आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते, तेव्हा शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळणं कठीण होतं. ज्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो आणि त्यामुळं थकवा, चक्कर येणं, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं, त्वचा पिवळी पडणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. अशा परिस्थितीत हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी तुम्ही आहारात बदल करू शकता जे त्याच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. जाणून घ्या हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करणारे पदार्थ.
व्हिटॅमिन सी समृद्ध अन्न : शरीराला लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी एक माध्यम आवश्यक आहे. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध संत्री, शिमला मिरची, टोमॅटो, द्राक्षे, बेरी इत्यादींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
लोहयुक्त पदार्थ : लोहाची कमतरता हे हिमोग्लोबिन पातळी कमी होण्याचं एक प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहारात लोहयुक्त हिरव्या भाज्या, टोफू, पालक, अंडी, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि बीन्स, मांस, मासे, सुका मेवा इत्यादींचा समावेश करणं खूप महत्वाचं आहे.