हैदराबाद : झोपेच्या कमतरतेमुळं आपल्या आरोग्यावर आणि कामावर परिणाम होतो. आपल्या शरीराला दररोज 7-8 तासांची झोप आवश्यक असतं. या काळात तुमचा मेंदू आणि शरीराचे इतर अवयव चांगलं कार्य करू शकतील. पण झोप न मिळाल्यानं आपल्या शरीरातील थकवा दूर होत नाही, ज्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. चांगली झोप ऑफिसमध्ये तुमची कामाची क्षमता वाढवण्यास मदत करते. त्यामुळं दररोज पूर्ण झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे.
चांगली स्मरणशक्ती :झोपेच्या कमतरतेचा तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होऊन काम करण्याची क्षमता प्रभावित होते. झोपेच्या कमतरतेमुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो आणि समस्या सोडवण्याची क्षमताही कमी होते, ज्यामुळे कार्यालयातील तुमची कामगिरी नकारात्मकदृष्ट्या प्रभावित होऊ शकते. त्यामुळे चांगली झोप घेणे खूप गरजेचं आहे.
कमी आजारी पडता : झोपेच्या कमतरता अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. खराब आरोग्यामुळं तुमच्या कामाची कार्यक्षमता कमी होते आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे, रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका देखील असतो, ज्यामुळे तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो.