प्रसूतीनंतर स्तनपान हे आई आणि मुलासाठी वरदान आहे. यामुळे बाळाची वाढ होते, रोगांची लढण्यासाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि स्तनपानामुळे आई-बाळाचे नाते आणखी घट्ट होते. आयुर्वेदातही स्तनपानामुळे बाळांना होणारे फायदे आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे. बीआरकेआर सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य बीएएमएस, एमडी असलेले डाॅ. श्रीकांतबाबू पेरुगू सांगतात, ‘अगदी सुरुवातीपासून स्तनपान आवश्यक असल्याचे आयुर्वेद सांगते. शक्यतो बाळाला जन्म देणारी आईच स्तनपान देते. पण समजा आई ठराविक कारणाने आजारी असेल तर दुसरी स्त्री स्तनपान देऊ शकते आणि तिला धात्री असे म्हणतात. ‘
गुणधर्म ( स्तन्यसंपत )
बाळासाठी स्तनपान हे खूप महत्त्वाचे आहे. जन्मानंतर कमीत कमी ६ महिने तरी ते आवश्यक आहे. बाळ स्तनपानापासून वंचित राहता कामा नये. डाॅ. श्रीकांतबाबू कुठले आईचे दूध योग्य ते खालीलप्रमाणे सांगतात –
- त्याचा रंग सर्वसाधारण हवा
- नैसर्गिक सुवास हवा.
- सर्वसाधारण सातत्य हवे.
- बाळासाठी थोडे गोड आणि स्वादिष्ट हवे.
- दूध एक कप पाण्यात मिसळले तर सहज आणि पूर्णपणे विरघळले गेले पाहिजे.
दुधाच्या या गुणधर्मामुळे बाळाचे योग्य पोषण आणि वाढ होते.
संबंधित गोष्टी ( स्तन लक्षण )