हैदराबाद :26 जानेवारी हा दरवर्षी प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) म्हणून साजरा केला जातो. तसे, या दिवशी सर्वांना सुट्टी असते. पण अनेक लोक प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांच्या शाळेत, काॅलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी अशा इत्यादी ठिकाणी जातात. अनेकजण या दिवशी बाहेर फिरण्याचाही बेत आखतात. यादरम्यान कपड्यांपासून ते अॅक्सेसरीज आणि मेकअपपर्यंत देशभक्तीची झलक सहज पाहायला मिळते. आजकाल बाजारात तिरंग्याच्या रंगाचे ड्रेस, बांगड्या, नेकलेस, हेअर कलर, कानातले, टिकली आणि इतर गोष्टी विकल्या जात आहेत. या गोष्टींमध्ये भगवा, पांढरा आणि हिरवा या तिन्ही रंगांचे मिश्रण असतात. 26 जानेवारीला या गोष्टी परिधान तुम्ही सहज देशभक्तीची भावना (feeling of patriotism) दाखवू शकता.
1. बांगड्या : जर तुमच्याकडे तिरंग्याच्या रंगाचा ड्रेस उपलब्ध नसेल तर तुम्हीतिरंग्याच्या रंगातील बांगड्याचा सेट घालू शकता. बांगड्या घालताना बांगड्याचे तीन सेट तयार करून घ्या. भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या वापरून ट्रायो बनवू शकता. हिरव्या, भगव्या आणि पांढऱ्या बांगड्या एकत्र करून एका हातावर किंवा दोन्ही हातावर घाला, त्या खूप आकर्षक (look fashionable on this Republic Day) दिसतील. 2. कानातले :हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कानातले मिळतात. धाग्यांनी बनवलेल्या तिरंग्याच्या कानातल्यांचीही या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विक्री होते. हे झुमके घालून तुम्ही प्रजासत्ताक दिनाप्रमाणे तुमचा लूक बनवू शकता.