महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Relationship Advice : चुकीच्या नात्यात आहात असे वाटत असेल तर 'या' प्रकारच्या लोकांपासून राहा दूर - कपटी व्यक्ती

अनेक वेळा नात्यात अनेक कारणांमुळे अंतर (Couples Distant) येऊ लागते, त्यामुळे एकटेपणा जाणवू लागतो. डेटिंग केल्याने आपण समोरील व्यक्तीला चांगले जाणून घेतो. पण चुकीच्या नात्यात आहात असे बऱ्याचदा वाटू लागते. मग अशावेळेस तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यक्तीपासून दूर राहावे. आम्ही याबद्दल सांगणार आहोत. (Relationship Advice)

Relationship Advice
चुकीच्या नात्यात आहात असे वाटत असेल तर 'या' प्रकारच्या लोकांपासून राहा दूर

By

Published : Dec 6, 2022, 1:43 PM IST

हैदराबाद :डेटिंगच्या जगात नेहमीच धोका असतो आणि काही विशिष्ट प्रकारचे लोक असतात, ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये असतात जी तुम्हाला नंतर नातेसंबंधात दुखवू शकतात. मग अशावेळेस तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यक्तीपासून दूर राहावे. आम्ही याबद्दल सांगणार आहोत. (Relationship Advice)

1. मद्यापानाचे व्यसन (Alcoholic Person) : ज्या व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन आहे, अशी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य जोडीदार असू शकत नाही. व्यसनामुळे भल्याभल्यांचे आयुष्य बरबाद झाले आहेत. त्यामुळे तुम्ही मद्यपानाचे व्यसन असलेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवा.

2. कपटी व्यक्ती (Mean person) :तुम्ही ज्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये आहात ती फक्त स्वतःचा विचार करते का? तुमचा विचार किती करते, याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे. अशा परिस्थितीत ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नसेल. जर एखादी व्यक्ती तुमच्या गरजांची काळजी घेत नसेल तर तो तुमच्यासाठी योग्य नाही.

3. नियंत्रित व्यक्ती (controlled person) :तुमच्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य जोडीदार असू शकत नाही. तुमच्या जीवनशैलीवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवणारी व्यक्ती योग्य असू शकत नाही. तुम्ही काय घालता किंवा तुम्ही काय खाता अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. सहन करू नका आणि अशा लोकांपासून दूर राहा असा हा गैरवर्तनाचा प्रकार आहे.

4. लबाड (liar) :जर एखादी व्यक्ती नात्याबद्दल सत्य दाखवू शकत नसेल किंवा पुन्हा पुन्हा खोटे बोलत असेल तर ती तुमच्यासाठी योग्य नसेल. ती व्यक्ती स्वतः तुमची फसवणूक करण्याची परिस्थिती निर्माण करू शकते. सतत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीपासून तुम्ही चार हात अंतर ठेवले पाहिजे.

5. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबत नसते :जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची गरज भासते तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबत नसते आणि जर असे सतत घडत असेल तर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्हाला भेटण्यासाठी ती वेगवेगळी कारणे देते तेव्हाच तुम्हाला समजणे खूप गरजेचे आहे.

6. नातेसंबंधात विश्वासघात :कधीकधी केवळ काही पुरुषच नाही तर स्त्रिया देखील त्यांच्या सहकाऱ्यांकडे किंवा इतर लोकांकडे आकर्षित होतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा ऑफिसमध्ये प्रणय, घराबाहेरील इतर लोकांशी भावनिक किंवा शारीरिक संबंध अशा घटना घडतात. त्याचबरोबर अनैतिक संबंध किंवा घराबाहेर संबंध ठेवण्याकडे काही लोकांचा कल असतो. अशा परिस्थितीत जर त्यांच्या जोडीदाराला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली तर त्यांच्यातील विश्वास तुटतो. दुसरीकडे, या सर्व गोष्टी असूनही जर ते एकत्र राहत असतील, मुख्यतः निराशा, इतरांबद्दल त्यांच्या मनात राग असेल, तर कधी कधी द्वेषाची भावना निर्माण होते. त्यामुळे तुमच्यात भावनिक अंतर आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. अशावेळेस तुम्ही त्या नात्यातून बाहेर पडा.

ABOUT THE AUTHOR

...view details