1. चेन्नई (Chennai) :जर तुम्ही हिवाळ्याच्या हंगामात कौटुंबिक सुट्टीवर जात असाल तर समुद्रकिनारी असलेल्या शहरांना भेट द्या. या हंगामात उत्तर भारतातील भागात कडाक्याची थंडी असते. तुम्ही तुमच्या मुलांसोबत चेन्नईला जाऊ शकता. तुम्ही तुमची सुट्टी चेन्नईमध्ये तुमच्या कुटुंबासोबत घालवू शकता. चेन्नईमध्ये अनेक प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. यापैकी पार्थसारथीचे मंदिर, संग्रहालय आणि प्राणीसंग्रहालय ही मुलांसाठी योग्य ठिकाणे आहेत. (Holiday Destinations in India )
2. महाबळेश्वर (Mahabaleshwar) : महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. तुम्ही तुमचा विकेंड साजरा करायला मित्र परिवार, पार्टनर किंवा फॅमिलीसोबत जाऊ शकता. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून 1362 मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.