महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

कोविड-१९ विरोधातील लस शोधण्यासाठी 'मर्क' आणि 'आयएव्हीआय' येणार एकत्र.. - मर्क कोरोना लस

ही लस विकसित करताना रिकॉम्बिनंट व्हेसिक्युलर स्टोमाटायटीस विषाणू(आरव्हीएसव्ही) तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. मर्कने विकसित केलेल्या ईबोला जायर विषाणू लस, ईआरव्हीईबीओ (ईबोला जायर विषाणू, लाईव्ह) मध्ये याचाच मूलभूत वापर करण्यात आला आहे. ईआरव्हीईबीओ ही मनुष्यांवर उपचारासाठी वापरास मंजुर करण्यात आलेली पहिली आरव्हीएसव्ही लस होती.

IAVI and Merck collaborate to develop vaccine against COVID-19
कोविड-१९ विरोधातील लस शोधण्यासाठी 'मर्क' आणि 'आयएव्हीआय' येणार एकत्र..

By

Published : Jun 3, 2020, 10:27 PM IST

हैदराबाद : विनानफा तत्त्वावर चालणारी वैज्ञानिक संशोधन संस्था आयएव्हीआय आणि एमएसडी नावाने प्रसिद्ध असलेल्या मर्क कंपनीने कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी लस विकसित करण्याची घोषणा केली आहे. चीनच्या वुहान प्रांतात या विषाणूचे मूळ असल्याचा आरोप आहे.

सार्स-सीओव्ही-२ ही लस विकसित करण्यासाठी आणि तिचे जागतिक स्तरावर मूल्यमापन करण्यासाठी दोन्ही संस्था एकत्र मिळून काम करणार आहेत. जर ही लस मंजुर झाली, तर जगभरात ही लस स्वस्त दरात उपलब्ध करुन देणे हा मुख्य उद्देश आहे.

ही लस विकसित करताना रिकॉम्बिनंट व्हेसिक्युलर स्टोमाटायटीस विषाणू(आरव्हीएसव्ही) तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. मर्कने विकसित केलेल्या ईबोला जायर विषाणू लस, ईआरव्हीईबीओ (ईबोला जायर विषाणू, लाईव्ह) मध्ये याचाच मूलभूत वापर करण्यात आला आहे. ईआरव्हीईबीओ ही मनुष्यांवर उपचारासाठी वापरास मंजुर करण्यात आलेली पहिली आरव्हीएसव्ही लस होती.

मर्क संशोधन प्रयोगशाळेचे अध्यक्ष डॉ. रॉजर एम. पर्लमटर म्हणाले की, “कोविड-१९ हे एक भव्य वैज्ञानिक, वैद्यकीय आणि जागतिक आरोग्याचे आव्हान आहे. सार्स-सीओव्ही-२ चा संसर्ग झाल्यामुळे होणारा त्रास दूर करण्याच्या उद्देशाने विविध संसर्गविरोधी औषधे आणि लसी विकसित करण्यासाठी मर्क जगभरातील संस्थांबरोबर सहकार्य करीत आहे. मर्क आणि आयएव्हीआय हे आपापली शक्तिस्थाने एकत्र करुन आरव्हीएसव्ही लस विकसित करण्याच्या प्रक्रिया वेगवान करण्यास उत्सुक आहेत. कोविड-१९ महामारीचा छेदक वक्र बोथट करणे हा त्यामागील उद्देश आहे.”

आयएव्हीआयचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मार्क फिनबर्ग म्हणाले की, “आम्हाला विश्वास आहे की आरव्हीएसव्ही वर आधारलेले लसीचे धोरण हे नव्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आशादायी दृष्टिकोन प्रदान करते. आणि मर्कबरोबर मिळून आम्ही आमच्या सार्स-सीओव्ही-2 विरोधातील लसीची क्षमता तपासून पाहण्यासाठी विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची वाट पाहत आहोत. मर्क आणि आयएव्हीआय यांच्यातील सहकार्य हे अभिनव भागीदारी प्रारुप दर्शवते. त्याचप्रमाणे, यातून हे कठीण जागतिक आरोग्य आव्हान सोडविण्यासाठी आमच्या संयुक्त क्षमतांचा पूरक आणि समन्वयात्मक मार्गांनी उपयोग करण्याचा दृष्टीकोनदेखील दिसून येतो.”

संस्थेने असाही दावा केला आहे की, डॉ. स्वाती गुप्ता, प्रमुख, उदयोन्मुख संसर्गजन्य आजार आणि वैज्ञानिक धोरण, आयएव्हीआय यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला हा कार्यक्रम एचआयव्ही तसेच इतर उदयोन्मुख संसर्गजन्य रोगांवर आरव्हीएसव्ही लस विकसित करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नांचा भाग आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details