वातावरणात थंडी आल्याने त्वचेतील कोरडेपणा वाढू लागतो. कारण थंड हवा त्वचेची आर्द्रता कमी करते. त्यामुळे, आपला चेहरा काळा दिसू लागतो.
उत्तराखंड येथील डर्मेटोलॉजिस्ट डॉ. आशा सकलानी सांगातात की, हिवाळ्यात थंड वातावरणाचे त्वचेवर प्रभाव आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने, तर कधी अधिक वेळ उन्हात बसल्याने होणाऱ्या सन बर्नमुळे आपली त्वचा कोरडी, निर्जीव आणि टॅन होते. ज्यामुळे त्वचेच्या रंगात तात्पुरता बदल होतो. तेच अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच, डिहायड्रेशन देखील त्वचेच्या रंगात बदल घडून आल्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे, हिवाळ्यात त्वचेची अधिक आणि योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
थंडीच्या मोसमात त्वचेच्या सुरक्षेसाठी काय करावे?
डॉ. आशा सांगतात की, या मोसमात तळलेले, मसालेदार किंवा जंक फूडचे अधिक सेवन टाळले पाहिजे. कारण, या प्राकरचे अन्न आपल्या पचन तंत्राला प्रभावित करते, ज्यामुळे त्वचेचे रंग बदलण्याबरोबरच आपल्या चहेऱ्यावर दाण्यांची समस्या निर्माण होऊ लागते. थंडीत त्वचेचे रंग बदलण्याबरोबरच इतर समस्यांपासून बचावासाठी पुढील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
1) शरीराला हायड्रेट ठेवावे
डॉ. आशा सांगतात की, साधारणत: लोक हिवाळ्यात पाणी कमी पितात, जे योग्य नाही. हिवाळ्यात त्वचेची आर्द्रता राखून ठेवण्यासाठी नियमित आवश्यक प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे. ज्यासाठी दिवसातून कमीत कमी 8 - 12 ग्लास पाणी पिले पाहिजे.
पाण्याव्यतिरिक्त फळ आणि भाज्यांचे ज्यूस व सूप आणि अन्य तरी असणाऱ्या आहाराचे सेवन देखील फायदेशीर असते. मात्र, अधिक गरम पाण्याचे सेवन टाळावे.