नवी दिल्ली - कोरोना महामारीची दुसरी लाट संपूर्ण देशात पसरलेली आहे. यातच देशात कोरोनाची तिसरी लाट पसरणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तिसरी लहर कधी येईल हे सांगता येणार नाही. परंतु तीचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी केली पाहिजे, याचा निश्चितपणे विचार केला जाऊ शकतो. कोरोनाचा जेव्हा प्रसार झाला. तेव्हा तो सर्वांसाठी नवा होता. त्यानंतर पहिली आणि दुसरी लाट देशात पसरली. पहिल्या लाटेच्यावेळी मास्क, सॅनिटायझर इत्यादींची कमतरता होती. तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि रूग्णालयात बेडांची तीव्र कमतरता होती. यामुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमावावा लागला. तिसऱ्या लाटेत असे काय करावे, जेणेकरून लोकांचा जीव वाचेल हा प्रश्न उद्भवतो.
तिसऱ्या लाटेत मुलांना त्रास होईल, असे म्हटले जात आहे. परंतु मुलांना असा गंभीर आजार होत नाही. दुसर्या लाटेतही मुलांना कोरोनाची बाधा झाली नाही, असे एम्स जोधपूरचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. अमित गोयल यांनी सांगितले.
रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ वाढवायचे का? या प्रश्नाच्या उत्तरात अमित गोयल म्हणतात, की रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ वाढवणे फार महत्वाचे आहे. आरोग्य कर्मचारी कठीम परिस्थितीत काम करत आहेत. ब्लॅक फंगसची प्रकरणे पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचारांचा प्रोटोकॉल पाहिल्यानंतरच उपचार केले पाहिजेत.
कोरोनाशी सामना करण्यासाठी चांगली तयारी केल्यास तिसऱ्या लाटेत मृत्यू कमी होऊ शकतात. एसबीआयच्या अहवालानुसार दुसर्या लाटाप्रमाणेच देशात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येईल. तीसरी लाट खूप धोकादायक असेल. तिसरी लाट 98 दिवसांपर्यंत राहील, असा अंदाज लावण्यात आला आहे.
सरकारने तातडीने छोट्या-मोठ्या रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड वाढवावेत. केवळ मोठ्या रुग्णालयांमध्ये तयारी केली जाऊ नये, परंतु लहान रुग्णालयांना सुद्धा त्यांच्या स्तरावर तयारी करावी, असे दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात आपत्कालीन विभाग प्रमुख ऋतु सक्सेना यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड उपचाराचे प्रशिक्षण द्यावे लागेल. आयसीयू बेड चालवण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल. ज्या पद्धतीने अग्निसुरक्षा प्रशिक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा कर्मचारी, या सर्व लोकांना कोविडसाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. यामुळे लाटाचा सामना करणे सुलभ होईल, असेही ते म्हणाले.
प्रशिक्षित मनुष्य शक्ती असणे खूप महत्वाचे आहे. दंतचिकित्सक डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे. एमबीबीएस शिकणार्या विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून आवश्यक असल्यास ते कर्तव्य बजावू शकतील.
देशभरातील तिसर्या लाटेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. राज्ये आपल्या स्तरावर तयारी करत आहे. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आधीच तयारी केली आहे. सरकारकडे 13 लोकांचा एक पथक तयार केले आहे. जो कृती आराखडा तयार करेल आणि आरोग्यासाठी ज्या काही गरजा असतील त्यावर काम करेल. बेड, ऑक्सिजन औषधे इत्यादींवर काम केले जाईल. या व्यतिरिक्त दिल्ली सरकारने 8 सदस्यांची नेमणूक केली आहे, जी तिसऱ्या लाटेवर स्वतंत्रपणे काम करेल.
सर्व प्रथम डॉक्टर आणि मनुष्यबळाची कमतरता असेल. डॉक्टरांना नकारात्मक परिणामापासून वाचवावे लागेल. दुसर्या लाटेदरम्यान कर्मचारी, नर्सची कमतरता जाणवली होती. 30 टक्के लोक 70 टक्के लोकांवर उपचार करू शकत नाहीत. तिसर्या लाटेत आपल्या क्षमतेच्या पलीकडे कार्य करावे लागेल, असे दिल्लीच्या अरदेंत गणपती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अंकित ओम यांनी सांगितले.
रुग्णालयांमध्ये मुलांवर उपचार करण्यासाठी उपकरणे आवश्यक असतील. आपल्या काय त्रास होत आहे, हे मुले सांगू शकत नाहीत. म्हणून मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवता येणार नाही. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट येईल, असे म्हणणे चुकीचे आहे. अर्थव्यवस्थेसाठी अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच तीसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. लवकरात लवकर कोरोनाच्या तीसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी करावी. कारण, कोरोना भविष्यात किती नुकसान पोहचवले याची पुष्टी नाही.