महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Jaggery Paratha Recipe : 'ही' गुळाची पोळी पाहून तुमच्या तोंडाला सुटेल पाणी, जाणून घ्या झटपट रेसिपी - गुळाची पोळी बनवण्याची कृती

गुळाच्या पोळीचे नाव काढताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. दरवर्षी मकर संक्रांतीला (Makar Sankranti 2023) गुळाची पोळी बनवली जाते. मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू झाली असून संक्रांतीनिमित्त महिला नवनवीन रेसिपी बनवत (How to make Jaggery Paratha) आहेत. तर यावेळेस आपण गुळाच्या पोळीची (Jaggery Paratha Recipe) रेसिपी जाणून घेवूया.

Jaggery Paratha Recipe
गुळाची पोळी

By

Published : Jan 6, 2023, 4:58 PM IST

हैदराबाद :तुम्ही कधी हिवाळ्यात गुळाची पोळी खाल्ली आहेत का? अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे आणि झटपट होणारा आहे. तुम्ही देखील करू शकता ही गुळाची पोळी. मकर संक्रांती (Makar Sankranti 2023) तसेच हिवाळ्यातील निरोगी आणि स्वादिष्ट पदार्थ आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल. दुसरीकडे, गुळाची पोळी चवदार आणि आरोग्यदायी देखील आहे.गुळाची पोळी (Gulachi Poli Recipe) संक्रांतीमिनित्त घरोघरी बनविली जाणारी खमंग व खुसखुशीत अशी ‘गुळाची पोळी’ कशी बनवतात ते आज आपण पाहूयात. बनवायला पण खूप (How to make Jaggery Paratha) सोपी आहे, चला तर मग जाणून घेऊया गुळाची पोळी (Jaggery Paratha Recipe) बनवण्याची पद्धत.

गुळाची पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients required for making jaggery paratha) :गूळ - 1 कप पावडर, गव्हाचे पीठ - 200 ग्रॅम, सुका मेवा - 50 ग्रॅम, तूप - 50 ग्रॅम, मीठ - चिमूटभर, खोबऱ्याचा किस - 1/2 कप, मैदा आणि बेसन.

गुळाची पोळी बनवण्याची कृती (Recipe for making jaggery paratha) :गुळाची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ चाळून घ्या. नंतर त्यात 2 चिमूटभर मीठ घालून चांगले मिक्स करा. तेल व तूप गरम करून त्यात बेसन व कणीक खमंग भाजा. गॅस बंद करून इतर साहित्य घाला. थंड झाल्यावर त्यात किसलेला गूळ घालून चांगले एकजीव करा. कणीक, मैदा आणि बेसन एकत्र करावे. दोन टे.स्पून कडक तेलाचे मोहन घाला. घट्टसर कणीक भिजवा. यानंतर, आपण सुमारे 15 मिनिटे सेट करण्यासाठी ठेवा. नंतर कढईला तूप चांगले ग्रीस करून गरम करा. पोळ्या करतांना दोन कणकेच्या लाट्यांमध्ये एक गुळाची लाटी ठेवा. गूळ घट्ट वाटल्यास दुधाच्या हाताने मऊ करा. यानंतर, आपण सुमारे 15 मिनिटे सेट करण्यासाठी ठेवा. नंतर कढईला तूप चांगले ग्रीस करून गरम करा. पराठा लाटून दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या. वरून तुपाची धार लावून गरमागरम गुळाची पोळी खाण्यास द्या. आता तुमचा चविष्ट गुळाचा पराठा तयार आहे.

गुळाचे फायदे :त्वचेच्या आरोग्यासाठीही गूळ फायदेशीर आहे. वास्तविक, ते रक्तातील हानिकारक विष काढून टाकून त्वचा स्वच्छ करण्यात मदत करते आणि रक्त परिसंचरण देखील सुधारते. रोज थोडासा गूळ खाल्ल्याने मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळते तसेच त्वचेत चमक येते. शरीरात लोहाची कमतरता असल्यास गूळ तुम्हाला खूप मदत करू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details