महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Breakup Effects On Heart : ब्रेकअप आपल्या हृदयावर कसा परिणाम करते ? जाणून घ्या येथे - Sukhibhava News

ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात ब्रेकअप झालेल्या व्यक्तीच्या हृदयावर ब्रोकन हार्ट सिंड्रोमचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासह ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला निद्रानाश, भावनिक आणि माणसिक ताणावासह नैराश्याचा सामनाही करावा लागतो.

Breakup Effects On Heart
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 17, 2023, 1:08 PM IST

नवी दिल्ली : तरुणाई सध्या व्हॅलेन्टाईन पर्व साजरा करण्यात दंग आहे. मात्र या दरम्यान अनेकांचे ब्रेक अप होण्याच्या घटनांही वाढल्या आहेत. त्यामुळे ब्रेकअप हे फक्त भावनात्मक आणि माणसिक तणावाशी संबंधित असतो. मात्र त्याचे परिणाम आपल्या हृदयावरही पडल्याचे दिसून येते. कधी कधी ब्रेकअप आपल्या हृदयासाठी धोकदायक ठरू शकते. जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती या लेखात.

ब्रोकन हार्ट सिंड्रोम :ब्रोकन हार्ट सिंड्रोम हा तीव्र ब्रेकअप किंवा नातेसंबंध तुटण्याच्या सामान्य परिणामांपैकी एक समजला जातो. ब्रेकअप झालेल्या हृदयाच्या सिंड्रोमची लक्षणे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक सारखीच असतात. ब्रेकअप झालेल्या हृदयाच्या सिंड्रोमच्या सामान्य लक्षणांमध्ये छातीत दुखणे, श्वास लागणे, हृदयाचे अनियमित ठोके आणि अचानक अशक्तपणा आणि थकवा येतो. त्यामुळे ब्रोकन हार्ट सिंड्रोम हा महत्वाचा घटक समजला जातो.

तणावामुळे येतो भावनिक आणि माणसिक ताण :ब्रेकअप झालेल्या हृदयावर अतिरिक्त तणाव येतो. त्यामुळे भावनिक आणि मानसिक ताणावाचा दुहेरी आघात ब्रेकअप झालेल्या व्यक्तीवर येतो. ब्रेकअप झाल्याने आलेला ताण हृदय सहन करु शकत नाही. त्याचा सामना करणे शक्य होत नसल्याने सतत अस्वस्थपणा जाणवतो. त्यामुळे शरीराच्या अवयवाला जास्त काम करावे लागते. शरीराच्या अवयवांच्या जास्त कामामुळे हृदयाच्या कामावरही ताण येतो. हृदयाच्या कामावर ताण आल्याने हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

ब्रेकअपमुळे करावा लागतो नैराश्याचा सामना : ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला नैराश्य येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ब्रेकअप झालेली व्यक्तीला तिव्र नैराश्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे नैराश्यात असलेली व्यक्ती घातक निर्णय घेण्याची शक्यता असते. नैराश्य व्यक्तीला अधिक लठ्ठपणा वाढण्याचा धोकाही असतो. त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतात. ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला निद्रानाशाचा सामना करावा लागतो. त्याच्या नातेसंबंधातील भावनिक चढउतारासह भावनिक आणि माणसिक ताणाव त्याच्या झोपेवर परिणाम करु शकतात. त्यामुळे ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला निद्रानाशाचा सामा करावा लागतो.

अनेक रोगांचा सामनाही करावा लागतो-जोपर्यंत आपण आपल्या दुःखावर मात करत नाही तोपर्यंत निद्रानाश चालू राहू शकते. शरीर आणि मनाला विश्रांती देण्यासाठी झोप महत्त्वाची आहे. मात्र निद्रानाश झाल्यास व्यक्तीला हृदयविकाराच्या धोक्यासह अनेक रोगांचा सामनाही करावा लागतो. ब्रेकअप झालेल्या व्यक्तीच्या खाणपाण आणि राहणीमानात बदल होतात. अतिझोप किवा निद्रानाशामुळे या व्यक्तीच्या जीवनात अनेक वाईट परिणाम होतात. भावनिक ताण विसरण्यासाठी काही जण दुम्रपाण किवा मादक पदार्थांचे सेवन करतात. काहीजमांना मद्यपाणांचे व्यसन लागते. त्यामुळे हृदविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

हेही वाचा - Interview Tips : अनेक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही? जाणून घ्या मुलाखतीच्या काही टिप्स

ABOUT THE AUTHOR

...view details