हैदराबाद : चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे म्हातारपणाचे लक्षण असते. पण आजकाल तरुणांच्या चेहऱ्यावरही सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वृद्धत्व, तणाव, कोलेजन, हार्मोन्सचे असंतुलन आणि प्रोटीनची कमतरता. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. चला तर- याविषयी जाणून घेऊया...
त्वचेची काळजी घ्या :सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, आपण वयाच्या 25 व्या वर्षापासून आपल्या त्वचेची काळजी घेणे सुरू केले पाहिजे, जेणेकरून पुढे आपल्याला सुरकुत्यांना तोंड द्यावे लागणार नाही. तुम्ही आपल्या त्वचेची जेवढ्या लवकर काळजी घ्याल तेवढ्याच लवकर तुम्हाला त्याचे परिणामही दिसून येतील. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही अंड्याचाही वापर करू शकता. यासाठी कच्च्या अंड्याचा पांढरा भाग नीट मिसळा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.
हळदीचा वापर करा :चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी हळदीचा वापर करणे खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात एक चमचा हळद आणि अर्धा चमचा गुलाबजल मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही काळ राहू द्या. नंतर चेहरा सामान्य किंवा कोमट पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केला जाऊ शकतो.
सुरकुत्या दूर होण्यास मदत :चांगले खाल्ल्याने त्वचा चमकदार राहते. त्यामुळे आहारात भरपूर फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. नाश्त्यात ड्रायफ्रुट्स घ्या आणि दिवसभरात किमान 3-4 लीटर पाणी प्या. यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण राहते. किवी फळाचा वापर करूनही चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात. यासाठी किवी फळ चांगले मॅश करा आणि पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट लावल्यानंतर काही वेळ अशीच राहू द्या. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हे उपाय केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
उन्हापासून सुरक्षा :सर्वात आधी तुम्हाला तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून स्वत:चे रक्षण केले पाहिजे. 20 ते 30 च्या वयांत तीव्र उन तुमच्या त्वचेलाच नुकसान पोहोचवत नाही तर, दीर्घ काळापर्यंत त्याचा प्रभाव सुरकुत्याच्या रुपात तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. उन्हामुळे जेव्हा त्वचेचे नुकसान होते तेव्हा तातडीने त्वचा तज्ज्ञाला ते दाखवले पाहिजे. तो माइक्रोडर्माब्रेशन, केमिकल पील, लेजर थेरेपी आणि रेटिनॉइड्सच्या मदतीने तुमच्या त्वचेवर उपाचार करू शकतो.