नवी दिल्ली : देशाभरात सध्या होळीचे रंग उधळले जात आहेत. त्यामुळे हवेतही रंग भरलेले असल्याचे पहायला मिळत आहेत. नागरिक मोठ्या आनंदाने होळी साजरी करत आहेत. त्यामुले देशभरात होळीचा मोठा उत्साह असल्याचे दिसत आहे. होळीच्या सणानिमित्त नागरिकांची खाण्याची मोठी रेलचेल असते. विविध डीश होळीनिमित्त करतात. त्यामुळे होळीत कोणत्या डीश तुमच्यासाठी खुसखुशीत असतील याबाबतची माहिती तुम्हाला देत आहोत.
पारंपरिक पदार्थ करतील तुम्हाला संतुष्ट :होळीच्या दिवशी घरात गोड आणि चवदार पदार्थांच्या सुगंधाने भरलेली असतात. त्यामुळे आनंदाच्या उत्सवात मोठी भर पडते. करंजी, गोड पदार्थासह दही भल्ला आदी बरेच काही पारंपरिक पदार्थ तुम्हाला संतुष्ट करतील. त्यामुळे होळीचे खास गोड पदार्थ करुन आनंद घेण्याचा विचार करत असाल तर येथे काही पारंपरिक खाद्यपदार्थ आम्ही खास तुमच्यासाठी देत आहोत.
हलवा ( Halwa ) : हलवा हा भारतातील प्रत्येक राज्यातील नागरिकांचा आवडता पदार्थ आहे. उत्तर भारतात तर होळीला खास हलवा बनवला जातो. हलवा बनवायाल एकदम सोपा आहे. हलवा बनवताना सुजी, दूध, आणि साखर याचा उपयोग करुन हलवा बनवण्यात येतो. सणावारांसाठी तर हलवा हे गृहिणींच्या हक्काची डीश असल्याचेही दिसून येते. अनेक ठिकाणी सुजीचा हलवा अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळे या होळीला खास हलवा बनवून तुम्ही आपल्या कुटूंबियांचा आनंद द्विगुणीत करू शकता.
करंजी ( Gujiya ) :करंजी हा महाराष्ट्रातील गृहिणींचा आवडता पदार्थ आहे. तर उत्तर भारतात त्याला गुज्जीया म्हणून संबोधले जाते. सणावाराला करंजी तुमच्या जेवणाचा आनंद द्विगुणीत करते. भारतातील प्रत्येक घरात सणावाराला करंजी करण्यात येते. करंजी ही खाण्यास खुसखुशीत असल्याने घरातील सगळ्यांचाच तो आवडता पदार्थ आहे. करंजी खुसखुशीत करण्यासाठी त्यात नारळ, ड्राय फ्रूट आदी पदार्थ टाकण्यात येतात.