हैदराबाद :होळीचा सण हा रंग उधळण्यासह आनंद आणि उत्साहाचा सण आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसह होळीची पार्टी करण्यापेक्षाही एकत्र येऊन होळी साजरी करुन जीवनाचा आनंद घेत प्रेमाने होळीचे रंग खेळणे हे होळीसाठी महत्वाचे असते. त्यामुळे होळीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची आम्ही तुम्हाला माहिती देतो, त्यामुळे तुमची होळी होईल आणखी खास.
प्रभावी पोशाख : होळी हा रंग उधळण्याचा सण आहे. त्यामुळे तुमचा पोशाख हा अतिशय योग्य असयला हवा. तुम्ही जर पार्टीचे आयोजन करत असाल तर तुमच्या पाहुण्यांनाही आकर्षक पोशाख करायला हवा. त्यासाठी पांढरा पोशाख हा रंग खेळण्यास अतिशय योग्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुरुषांनी पांढरा पोशाख करावा तर महिलांनी पांढरी साडी परिधान करावी.
सेंद्रीय रंगाचा करा उपयोग :होळी खेळताना केमीकल युक्त रंगाचा उपयोग करू नका. त्यामुळे चेहऱ्यासह तुमच्या त्वचेवरही त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे रंग खेळताना ते सेंद्रीय पद्धतीने बनवलेले असतील असेच निवडा. बाजारात आता गुलाबाच्या फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत. त्यामुळे होळी खेळताना आपण नैसर्गिक रंगाचा उपयोग करा. त्यामुळे आपली होळी आनंदात साजरी करु शकाल.
रंग खेळताना त्वचेची काळजी घ्या :होळीचा रंग खेळण्यास तरुणांचा उत्साह मोठा असतो. मात्र त्या उत्साहाच्या भरात आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. केमीकलच्या रंगामुळे आपल्या त्वचेवर फार गंभीर परिणाम होतात. त्यामुळे त्वचेला खाज येणे, ड्राय स्कीन होणे, केसांची गळती होणे, आदी अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले रंग वापरुन तुम्ही होळीचा आनंद घेऊ शकता. केसांना आणि त्वचेला तेलाने योग्य मसाज करुन हानी होण्यापासून रोखू शकता.