महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

High Heels : 'ही' आहे 'हाय हील्स'ची रंजक गोष्ट; जाणून घ्या काय आहे इतिहास - हील्सचाही उच्च दर्जाशी संबंध

High heels : आजकाल हाय हील्स घालणं हा ट्रेंडमध्ये आहे. कॉलेजमध्ये जाणे असो किंवा ऑफिसमध्ये, मुली सर्वत्र याचा वापर करत असतात, पण तुम्हाला माहित आहे का पहिल्यांदा महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी हाय हील्स बनवल्या गेल्या. जाणून घ्या काय आहे हील्सची कहानी आणि ती महिलांच्या फॅशनचा भाग कशी बनली आहे.

High heels
हाय हील्स

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 5:28 PM IST

हैदराबाद : जेव्हा आपण हाय हील्सचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या मनात सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे महिला. महिलांना अनेकदा कोणत्याही फंक्शनला जाताना हील्स घालायला आवडतात जेणेकरून त्या उंच आणि सुंदर दिसू शकतील. हाय हील्स घालून चालणे खूप वेदनादायक आहे, परंतु तरीही महिला त्या परिधान करतात कारण ते फॅशन आणि स्टेटसशी संबंधित आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की आज ज्या हाय हील्सचा संबंध महिलांच्या फॅशनशी जोडला जातो, त्या पहिल्यांदा पुरुषांसाठी बनवल्या गेल्या होत्या. चला जाणून घेऊया काय आहे हील्सचा इतिहास आणि त्या महिलांच्या आवडत्या कशा बनल्या.

हील्स पुरुषांसाठी बनवली होती :हील्स, ज्याला आपण आज स्त्रियांशी जोडतो, ते प्रथम पुरुषांसाठी तयार केलं गेलं होतं. ते दहाव्या शतकात पर्शियन साम्राज्यात प्रथम वापरले गेले. युद्धादरम्यान घोडेस्वारी करताना पाय रकाबात अडकवण्यासाठी सैनिक हील्स घालत असत. यानंतर हील्सचाही उच्च दर्जाशी संबंध येऊ लागला.

15 व्या शतकात युरोपमध्ये पोहोचली :यानंतर 15 व्या शतकात हील्स युरोपमध्ये पोहोचली. जिथे श्रीमंतांनी त्यांचे स्टेटस दाखवण्यासाठी त्याचा वापर केला. त्यावेळी हील्स एक प्रकारे श्रीमंतांचं सामाजिक प्रतीक असायचं. त्याच्या पोशाखावरून तो मजूर वर्गातून आलेला नाही आणि त्याला कोणतेही श्रमिक काम करावं लागत नाही असे दिसून आलं.

16 व्या शतकापासून महिलांनी हील्स घालण्यास सुरुवात केली : महिलांमध्ये हील्सचा ट्रेंड 16 व्या शतकात सुरू झाला. हे उच्च कुटुंबातील महिलांची सामाजिक स्थिती दर्शविण्यासाठी वापरले जात होते. हील्स नेहमी लॉंगड्रेसखाली लपवून ठेवलं जायच्या, त्यामुळं हील्स जितकी जास्त असेल तितकी ती लपविण्यासाठी ड्रेसमध्ये जास्त फॅब्रिक वापरण्यात आलं. सामाजिक स्थिती दर्शविण्याचा हा देखील एक मार्ग होता.

'हील्सची क्रेझ' आजही कायम: स्त्रियांच्या हील्स पुरुषांच्या हील्सपेक्षा पातळ आणि लांब असत. असे मानले जात होते की ते परिधान केल्यानं महिलांच्या शरीराची रचना अधिक आकर्षक दिसते. तेव्हापासून महिलांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी हील्सचा वापर केला जाऊ लागला. हळूहळू पुरुषांनी हील्स घालणे बंद केलं आणि त्याऐवजी अधिक आरामदायक बूट वापरण्यास सुरुवात केली, परंतु महिलांनी स्वतःला अधिक आकर्षक दिसण्यासाठी हील्स घालणे सुरूच ठेवले. तेव्हापासून हील्स महिलांच्या फॅशनचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, जो आजही चालू आहे.

हेही वाचा :

  1. Protein Powder Side Effects : बॉडी बनवण्यासाठी तुम्हीही पिताय प्रोटीन पावडर? जाणून घ्या काय आहेत तोटे...
  2. Whiten your teeth naturally : तुमचेही दात पिवळे आहेत का? नक्की करून पहा हे उपाय
  3. How To Overcome Phone Addiction : तुम्ही फोनच्या व्यसनानं त्रस्त आहात? करून पहा 'हे' उपाय...

ABOUT THE AUTHOR

...view details