कोरोनासाठी कोणकोणत्या प्रकारच्या लस विकसित केल्या जात आहेत.. - कोरोना विषाणू लसींचे प्रकार
कोरोना विषाणुवर सातत्याने लस तयार करण्यावर संशोधन सुरू आहे. लस विकसित करणारे निष्क्रिय लस, जिवंत लस आणि डीएनए लस यांचे अनुकरण केले जात आहे. या या लसींमध्ये काय फरक आहे आणि त्या केव्हापर्यंत तयार होतील. वाचा आमचे खास सादरीकरण.
कोरोनासाठी कोणकोणत्या प्रकारच्या लस विकसित केल्या जात आहेत..
By
Published : May 13, 2020, 8:33 PM IST
|
Updated : May 21, 2020, 4:52 PM IST
हैदराबाद : कोरोना विषाणुच्या लसींवर सातत्याने संशोधन केले जात आहे. लस विकसित करणारे निष्क्रिय लस, जिवंत लस आणि डीएनए लस यांचे अनुकरण करत आहेत. या लसींमध्ये काय फरक आहे आणि कधीपर्यंत या लस तयार होतील,याची माहिती करून घेऊ या.
जिवंत किंवा थेट लस..
जिवंत किंवा थेट लस तयार करताना तिचा सुरूवातीचा बिंदू एक निरूपद्रवी माहित असलेला विषाणु आहे. तो आमच्या शरीरातील पेशी वाढवण्यास सक्षम आहे. हाच सदिश प्रेरक आहे, जो प्रतिकारशक्तिच्या प्रतिसादाला उद्युक्त करतो.
निष्क्रिय लस..
या लसीमध्ये निवडक विषाणुयुक्त प्रोटिन किंवा निष्क्रिय विषाणु असतात. त्यांच्यामुळे रोगजनूकांना मारले जाते मृत विषाणु यामुळे वाढत नाहीत. शरिरातील सुरक्षा प्रणाली प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीजचे उत्पादन केले जात आहे, हे सुनिश्चित करतात.
ही लस टोचलेल्या व्यक्तिमध्ये रोगाचा विकास होत नाही. या उपचारात वापरून कसोटीवर उतरलेल्या आणि परिक्षण केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. याचा उपयोग अगोदरपासूनच इन्फ्ल्युएंझा, पोलिओ, काली खांसी (हुपिंग कफ), हेपेटायटिस बी आणि धनुर्वात अशा आजारांवर लसीच्या रूपात केला जात आहे.
डीएनए लस..
विषाणुयुक्त प्रोटिनच्या तुलनेत जनुक आधारित लसीचा हा लाभ आहे की औषधी उद्योग या लसीचे उत्पादन लवकर करू शकतो. याचे उत्पादन करण्यासाठी आम्हाला सक्षम व्हावे लागेल. कोविड-१९ ची लस आल्यावर कोट्यवधी लोकांना याच्या डोसची आवश्यकता पडेल.
ही लस सध्या विकसित केली जात आहे. विविध कंपन्या आणि संस्था यावर संशोधन करत आहेत. जर्मनीत या लसीला पहिल्या टप्प्याची मंजुरी देण्यात आली आहे.
कोरोना विषाणुसाठी विकसित केल्या जाणाऱ्या लसींचे प्रकार
लसीचा प्रकार
कार्य प्रणाली
संख्या
विषाणुयुक्त लस
ही प्रतिकारशक्तिच्या प्रतिसादाला जागृत करून संसर्ग होण्यापासून वाचवते
०५
दुर्बल विषाणुयुक्त लस
कोरोना विषाणु शरिरातील पेशींना संसर्ग करून प्रतिकारशक्ति कमकुवत करतो. ही लस यापासून वाचवते.
०३
डीएनए आधारित
कोरोना विषाणु स्पाईक प्रोटिन निर्माण करणाऱ्या जनुकांना पेशीच्या गर्भात पोहचवते.
०९
आरएनए आधारित
कोरोना विषाणु स्पाईक प्रोटिनचे निर्माण करणाऱ्या अनुवंशिक निर्देशांना पेशींपर्यंत पोहचवते.
१६
गुणाकार न करणारा व्हायरल रोगवाहक
स्पाईक प्रोटिनसाठी डीएनए संहिता घेऊन जाण्यासाठी हा एक निरूपद्रवी विषाणु सक्षम आहे.
१४
विषाणु सदृष्य कण
अणु जे कोरोना विषाणुसारखे दिसतात परंतु पेशींना संसर्ग करू शकत नाहीत.
०६
प्रोटिन सबयुनिट
विषाणुचा एक लहानसा भाग असतो आणि त्याच्याबरोबरचाच घटक असतो जो प्रतिकाराच्या प्रतिसादाला उत्तेजित करतो.