शहरात राहताना झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अडचण येते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश, टी. व्ही (TV), आणि इंटरनेट (Internet) असल्यामुळे आपण आपली झोपेची वेळ (Sleeping time) पाळत नाही. खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.
विषारी पदार्थ बाहेर टाकणे महत्वाचे (Detoxification): रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया (circulatory process) मुख्यत्वे तुमच्या यकृतात (Liver) रोखलेली असते. तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरे तर शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची- (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. यकृत शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांना निष्क्रिय करुन त्याला बाहेर काढण्याचे महत्वाचे कार्य रात्री 11 ते पहाटे 3 च्या वेळेत करत असते. तथापि जर तुम्ही या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकत नाही. जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो.
जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ? : जर 12 वाजता झोपलात तर 3 तास, जर 1 वाजता झोपलात तर 2 तास, आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास इतकाच वेळ तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी मिळेल. जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडणार नाही. तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील. त्यामुळे तुम्ही अनेक आजाराचे बळी पडाल.