आपला हृदय जोपर्यंत धडकत आहे तोपर्यंत आपण जगत आहोत. मात्र, दर वर्षी बऱ्याच लोकांचा हृदय रोगामुळे मृत्यू होते. अशा परिस्थितीत जी लोकं हृदय रोगाने ग्रस्त आहेत आणि ज्यांचे हृदय काम नाही करत आहे, त्यांच्यासाठी हृदय प्रत्यारोपण हे एक आशेचे किरण ठरते. मात्र, आपल्या देशात भीती, धार्मिक श्रद्धा, जागरूकतेची कमतरता किंवा आर्थिक कारणास्तव फार कमी लोकांना हृदय प्रत्यारोपण करता येते. लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासोबतच हृदय प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक प्रगतीचे विश्लेषण करण्याच्या हेतूने दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी भारतात हृदय प्रत्यारोपण दिवस साजरा केला जातो.
भारतात पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण हे 3 ऑगस्ट 1994 रोजी अखिल भारतीय वैद्यकीय संस्थान (एम्स), नवी दिल्लीत झाले होते. प्राध्यापक पनंगीपल्ली वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात कमीत कमी 20 शल्यचिकित्सकांच्या पथकाद्वारे हे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या ऑपरेशनला जवळपास 59 मिनिटे लागलीत आणि या यशस्वी ऑपरेशननंतर रुग्ण कमीत कमी 15 वर्ष अधिक जीवंत राहिला.
7 जुलै, 1994 ला तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या स्वाक्षरीने मानवी अवयव प्रत्यारोपण विधेयक मंजूर झाले. त्यानंतर प्राध्यापक वेणुगोपाल यांनी त्याच वर्षी 3 ऑगस्ट रोजी एम्समध्ये भारतातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण करून इतिहास घडवला होता. त्यानंतर 1998 मध्ये वेणुगोपाल यांना भारताच्या तीसऱ्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्सच्या दिक्षांत समारंभात त्यांचा विशेष सन्मान केला होता.
कसे होते हृदय प्रत्यारोपण ?
हृदय प्रत्यारोपण ही एक अशी शस्त्रक्रिया आहे जी अशा रुग्णावर केली जाते जो हर्ट फेल्युअरच्या अंतिम अवस्थेत आहे. या शस्त्रक्रियेत नुकतेच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे काम करत असलेले हृदय त्याच्या शरीरातून काढून ते रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केले जाते. या ऑपरेशनसाठी ऑर्थोटोपिक आणि हेटेरोटोपिक प्रक्रियेची मदत घेतली जाते.
भारतात पहिले हृदय प्रत्यारोपण कधी झाले?
भारतात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही देवी राम नावाच्या 40 वर्षीय रुग्णावर झाली होती. देवी राम हा कार्डिओमायोपॅथी या आजाराने ग्रस्त होता. या रुग्णावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली होती. त्याचबरोबर, जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण हे 3 डिसेंबर 1967 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे सर्जन क्रिश्चियन बर्नार्ड यांच्याद्वारे करण्यात आली होती.