पावसाळ्यात त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जास्त खबरदारी घेण्याची गरज असते. ज्यासाठी छोट्या सवयींना आपल्या नियमित दिनक्रमात समाविष्ट केले जाऊ शकते. त्याचबरोबर, आपण काय खातो? आणि कोणत्या प्रकारचे फॅब्रिकचे (विणलेले कपडे) कपडे घालतो? याचा देखील आपल्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे, पावसाळ्यात त्वचेला निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? याबाबत जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' सौंदर्य तज्ज्ञ सविता कुलकर्णी आणि आहार व पोषण विशेषज्ञ डॉ. संगीता मालू यांच्याशी बातचीत केली.
आहारावर द्या लक्ष
आहार आणि पोषण विशेषज्ञ डॉ. संगीता मालू सांगतात की, प्राचीन काळापासूनच पावसाळ्यात काही विशेष प्रकारच्या खाद्य पदार्थांना टाळण्याचे सांगितल्या जाते. पावसाळ्याचा मोसम हा संसर्गाचा मोसम असल्याचे बोलले जाते आणि संसर्ग पसरवण्यात अन्न हा देखील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे, पावसाळ्यात जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे किंवा त्याचे कमीत कमी सेवन करावे.
या मोसमात हलके, ताजे आणि पौष्टिक आहार घेतले पाहिजे. त्याचबरोबर, फळांचे अधिक प्रमाणात सेवन देखील आरोग्यासाठी चांगले असते. कारण फळांमधील पौष्टिक तत्व शरीराला उर्जा तर देतातच, त्याचबरोबर त्यांच्यातील अँटीऑक्सिडेंट आपल्या शरीरातील विषारी कणांना बाहेर काढण्यासाठी मदत देखील करतात. त्याचबरोबर, या मोसमात न शिजवलेल्या किंवा कच्च्या भाज्या आणि सलाद खाणे टाळले पाहिजे, कारण या मोसमात सामान्यत: हिरव्या भाजांमध्ये किडे पडू लागतात. या मोसमात शरीराला हायड्रेटेड ठेवणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे, असे डॉ. संगीता मालू यांनी सांगितले.
त्वचेची नियमित काळजी घेणे आवश्यक
सौदर्य तज्ज्ञ सविता कुलकर्णी यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या मोसमात वातावरणात ओलावा वाढल्याने फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांमध्ये देखील त्वचेच्या समस्या वाढू लागतात. विशेषत: तेलकट किंवा मिश्र त्वचा असलेल्या लोकांना अशा प्रकारच्या समस्यांना अधिक समोरे जावे लागते. त्यामुळे, या मोसमात काही विशिष्ट सवयींना आपल्या नियमित स्किन केअर दिनक्रमात सामील करणे गरजेचे आहे, ज्यामुळे महिला आणि पुरुषांना त्वचेसंबंधी समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. या सवयी पुढील प्रमाणे आहे,