हैदराबाद : चहामुळे आपल्या दिवसाची सुरूवात ताजीतवानी होते. त्यामुळे सगळ्यांना चहाने वेड लावले आहे. त्यामुळे सकाळी एक कप चहा घेतल्याने तुम्हाला टवटवीत वाटू शकते आणि तुमचा मूड चांगला होऊ शकतो. त्यातही कामाच्या वेळेत चहाचा ब्रेक घेतल्याने आपल्याला नेहमी योग्य विचार करुन आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. त्यामुळे चहाच्या विविध प्रकाराविषयी आम्ही तुम्हाला येथे माहिती देत आहोत.
मसाला चहा :मसाला चहा हे भारतीय चहाचे पेय असून हा चहा विविध मसाल्यांनी तयार करण्यात येते. इतर सर्व चहापेक्षा आल्यामध्ये मिसळलेले चहाचे मसाले यात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. यात काळी मिरी, दालचिनी किंवा वेलची यांसारखे मसाले टाकल्याने तुम्हाला सकाळी पुन्हा टवटवीत आणि शांत वाटण्यास मदत होईल.
ग्रीन टी :ग्रीन टी हे केवळ संध्याकाळचे पेय नसून तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी कधीही याचा आनंद घेतला जाऊ शकतो. त्याचे अनेक आरोग्यदायक फायदे देखील आहेत. हा वाळलेल्या किंवा ताज्या हिरव्या चहाच्या पानांपासून बनवला जातो. आपल्या उर्जेचा समतोल राखून प्रत्येक कपाने आपल्याला सकारात्मक उर्जा देतो. ग्रीन टी फॅट बर्निंग असून त्यात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो.