महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Health tips for weakness : काम न करताही येतोय थकवा; आहारात करा या गोष्टींचा समावेश...

Health tips for weakness : जास्त काम केलं नाही तरी थकवा जाणवतोय... सकाळी उठण्याची इच्छा होत नाही. असं होत असेल तर शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी काही ताजी फळे आणि भाज्या खा. जाणून घ्या नेमकं काय खायचं.

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 2:34 PM IST

Health tips for weakness
थकवा

हैदराबादHealth tips for weakness : आयुष्यातील व्यग्रता इतकी वाढली आहे की 10-11 तास ऑफिसचं काम आणि नंतर घरच्या जबाबदाऱ्या. रोज इतकं काम करून थकवा येणं साहजिक आहे. थकवा दूर करण्यासाठी आपण काहीकाळ विश्रांती घेतो आणि मग आपल्याला थोडा आराम वाटतो. पण काही लोक असे असतात जे खूप कमी काम करतात. तास न् तास विश्रांती घेतात. तरीही त्यांच्या शरीरात थकवा आणि अशक्तपणा राहतो. जास्त काम न केल्यामुळे थकवा जाणवणे, सकाळी अंथरुणातून उठण्यास त्रास होणे, मधुमेह, नैराश्य, अशक्तपणा, थायरॉईड, संधिवात असे अनेक आजार होऊ शकतात. काहीवेळा शरीरात अशक्तपणा आणि थकवा येणे हे आहारातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे देखील होते. तुम्हालाही थकवा आणि अशक्तपणाचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करा. काही पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा आणि थकवा दूर होतो. काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही शरीरातील थकवा आणि अशक्तपणा सहज दूर करू शकता (benefits of dates for men).

  • ताजी, हंगामी फळे आणि भाज्या खा :जर शरीरात थकवा आणि अशक्तपणा असेल तर आहारात हंगामी फळे आणि हंगामी भाज्यांचे सेवन करा (seasonal fruits). तुम्ही तुमच्या आहारात जितकी जास्त ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश कराल, तितके जास्त पोषक घटक तुमच्या शरीराला मिळतील.
  • अंड्याचे सेवन करा, थकवा दूर होईल : अंड्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पोषक घटकांनीयुक्त अंडी शरीरातील याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीर निरोगी ठेवतात. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरच्या अभ्यासानुसार अंड्यामध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. अंड्याचे सेवन केल्याने शरीर भरलेले राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
  • ड्रायफ्रूटचे सेवन करा :ड्रायफ्रूट हे पोषक घटकांचे पॉवरहाऊस आहेत. यांच्या सेवनाने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. काजू आणि बदामचे सेवन केल्याने शरीरातील आवश्यक पोषक घटकांची कमतरता पूर्ण होईल आणि शरीराला ऊर्जा मिळेल. ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, अक्रोड आणि जर्दाळू खाऊ शकता. बियांमध्ये टरबूज आणि सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केले पाहिजे (dry fruits benefits for weight gain).
  • थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी पाणी प्या : जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा काहीवेळा त्या थकव्याचे कारण डिहायड्रेशन असते. शरीराला ताजेतवाणे ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी, शरीरात ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो आणि तुमची एनर्जी लेव्हल कमी होते तेव्हा एक ग्लास पाणी प्या. शरीरातील अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी दिवसातून सुमारे दोन लिटर पाणी प्या.

ABOUT THE AUTHOR

...view details