हैदराबाद :गुरू पुष्यष्यामृत योगाला योगांचा राजा संबोधले जाते. यावर्षी गुरू पुष्यामृत योग 27 एप्रलिला येणार आहे. 27 एप्रिलच्या सकाळी 7 वाजता गुरू ग्रह पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा योग दुसऱ्या दिवशी 28 एप्रिलच्या सुर्योदयापर्यंत राहणार असल्याची माहिती ज्योतिष्यतज्ज्ञांनी दिली आहे.
काय करावे गुरू पुष्यष्यामृत योगाला :गुरू पुष्यामृत योगाला योगांचा राजा मानले जात असल्याने या वेळी करण्यात आलेल्या शूभ कार्याचे फळ लाभदायक असते. गुरू पुष्यामृत योगाच्या शूभ मुहुर्तावर करण्यात आलेली कामे यशस्वी होत असल्याचे ज्योतिष्यतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे गुरू पुष्यामृत योगाला नागरिक आपले शूभ काम करण्याची योजना आखतात. नवीन नोकरी सुरू करण्यास हा काळ खूप महत्वाचा असतो. त्यासह नवीन संपत्ती घेणे, नवीन वाहन घेणे नवीन संपत्ती घेण्यासाठी गुरू पुष्यामृत योगाला खूप शूभ मानन्यात येते.
गुरू पुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर करत नाहीत लग्न :गुरू पुष्यामृत योगाला योगाचा राजा मानन्यात येत असले, तरी या योगाला अनेक कार्य करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ग्रहांची उलटी दशा असतानाही गुरु पुष्यामृत योग खूप महत्वाचा आणि शक्तीशाली मानन्यात येते. गुरु पुष्यामृत योग अशूभ वेळेलाही शूभ मुहुर्तात बदलत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या योगाला अनेक शूब कार्य करण्यात येतात. मात्र तरीही गुरु पुष्यामृत योगाला लग्न करण्यात येत नाहीत. या योगाला करण्यात आलेले लग्न कधीच यशस्वी होत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे गुरु पुष्यामृत योगाला लग्न करणे टाळले जाते. गुरु पुष्यामृत योग वर्षी 27 एप्रिलला गुरुवारी सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 6 वाजून 7 मिनीटापर्यंत राहणार आहे. या दिवशी कार्य करण्यास पवित्र मानन्यात येत असून धनत्रयोदशीच्या बराबरीचा हा योग असल्याची पुराणात मान्यता आहे.
माता लक्ष्मीचा जन्म झाल्याची अख्यायिका :गुरु पुष्यामृत योगालाच धन आणि संपत्तीची देवता लक्ष्मी मातेचा जन्म झाल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे गुरु पुष्यामृत योगाला खूप महत्वा प्राप्त होते. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरूवारी असल्यास त्याला गुरु पुष्यामृत योग असे संबोधतात. तर पुष्य नक्षत्र रविवारी पडल्यास त्याला रवि पुष्यामृत योग संबोधण्यात येते. या दोन्ही योगाला पुराणात धरत्रयोदशीच्या सारखेच महत्व असल्याचे सांगितले जाते. या योगाला सुर्योदय आपल्या सर्वोच्च मेष राशीत प्रवेश करणार आहे, तर चंद्र कर्क राशीत विराजमान असणार आहे.
हेही वाचा - Akshaya Tritiya Facts - अक्षय तृतियेचे पौराणिक महत्व घ्या जाणून