हैदराबाद- जगात मोठ्या संख्येने लोक थायराइडने ग्रासलेले आहे. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. १० पैकी १ भारतीय हाइपोथायराइडिज़्मने ग्रस्त होत आहे, असे आकडे सागंतात. व्यग्र जीवनशैली आणि वेळेवर जेवण न करणे या बाबी शरीरात थायराइडच्या स्तिथीला प्रभावित करत असते, असे तज्ञ सांगतात.
खाण्यापिण्याच्या योग्य सवयींनी थायरॉइडनियत्रंण ठेवावे -
थायरॉइड ही समस्या आहे जी आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. तज्ञांच्या मते, थायरॉइडशरीराच्या प्रत्येक भागाच्या कार्यांवर परिणाम करतो. थायरॉइडग्रस्त एखाद्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधे सेवन केल्यास, योग्य खाणपान केल्यास निरोगी जीवनशैलीच्या आधारे थायरॉइडमुळे होणाऱ्या समस्यापासून आपण वाचू शकतो.
थायरॉइड म्हणजे काय?
थायरॉइड हा अंतःस्रावी ग्रंथीचा एक प्रकार आहे जो ट्रायओडायोथेरोनिन (टी 3) आणि थायरॉक्सिन (टी 4) हार्मोन्स तयार करतात. जे शरीराच्या चयापचय प्रक्रिया संचालीत करतात. फुलपाखरूच्या आकाराच्या ग्रंथी गळ्याच्या आत आणि गळपट्टीच्या हाडाच्या वर असते.
थायरॉइड प्रामुख्याने हायपरथायरॉइडीझम आणि हायपोथायरॉइडीझम अशा दोन प्रकार असतात. शरीरात हार्मोन्स आणि आयोडीनचे प्रमाण कमी होणे किंवा जास्त होण्यामुळे परिस्थिती उद्भवते.
बंगळुरुच्या कोरामंगला येथील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयाचे पोषणतज्ञ डॉ. शरणा श्रीनिवास शास्त्री यांच्यानुसार शरीरातील हार्मोन्सच्या पातळीसह एखाद्या व्यक्तीचे वजन आणि आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटकांमुळे हायपरथायरॉईडीझम, हायपोथायरॉइडीझम आणि थायरॉइडीटिससारखी परिस्थिती उद्भवतात. ज्यामुळे व्यक्तीचे केस गळणे, टक्कल पडणे, वजन कमी होणे किंवा वजन वाढणे, अनियमित मासिक पाळी, थकवा, अस्वस्थता आणि चिडचिडेपणासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या लक्षणांच्या आधारावर थायरॉइडला हायपरथायरॉइडीझम आणि हायपोथायरॉइडीझममध्ये वर्गीकृत केले जाते.
थायरॉइड वर्गीकरण खालीलप्रमाणे -
हायपरथायरॉईडीझमची लक्षणे - अस्वस्थता, हृदयाची गती वाढणे, विचलित होणे, चिडचिड वाढणे, जास्त घाम येणे, सतत वजन कमी होणे आणि अशक्तपणा ही हायपरथायरॉइडीझमची मुख्य लक्षणे आहेत.
या स्थितीमुळे एखाद्या व्यक्तीवर होणारी आरोग्य समस्या खालीलप्रमाणे -
ग्रेव्ह रोग- ग्रेव्हज हा रोग हा प्रौढांमध्ये हायपरथायरॉइडीझमचे मुख्य कारण आहे. या रोगात शरीराचे वेटिंग सिस्टम टीटीएच वाढविणारे अँटीबॉडीज तयार करण्यास सुरवात करते. हा एक अनुवांशिक आजार आहे.
थायरॉइड नोड्यूल -थायरॉइड नोड्यूल थायरॉइडच्या आत घन किंवा द्रवयुक्त भरलेली गांठ असते.बहुतेकदा, डॉक्टरांनी तपासणी केल्याशिवाय लोकांना थायरॉईड नोड्यूल माहिती होत नसते.
थायरॉइडायटीस - थायरॉइड ग्रंथीमध्ये सूज येणाच्या अवस्थेस थायरॉइडायटीस म्हणतात.
आयोडीनसंबंधित समस्या- शरीरात आयोडीनची जास्त प्रमाणात निर्मिती होणे.
हायपोथायरॉइडीझमची लक्षणे- त्वचा आणि केसांचा कोरडेपणा, अशक्तपणा, जास्त वजन वाढणे, ताणतणाव, थंड वस्तू आणि थंड वस्तूसाठी वाढलेली संवेदनशीलता हायपोथायरॉइडीझमचा मुख्य लक्षण आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या खालीलप्रमाणे आहेत.
थायरॉइडायटीस - थायरॉइड ग्रंथीमध्ये जळजळ होणे आणि सूज येणे