आयुर्वेदानुसार दोशामध्ये (doshas/humor) असंतुलनाने विविध आजार होतात. वात, पित्त, आणि कफ या कोणताही एका दोशात वाढ किंवा घट झाल्यास आजार होतो. पित्त दोश वाढल्याने आम्लपित्त (hyperacidity) किंवा अॅसिडिटी होते. त्याला कसे नियंत्रणात ठेवता येईल, त्याची चिन्हे, लक्षणे आणि उपाय काय आहेत? याबाबत 'ईटीव्ही भारत सुखीभवने' डॉ. पी.व्ही रंगनायकुलू यांच्यापासून जाणून घेतले.
आम्लपित्त (hyperacidity) किंवा अॅसिड रिफ्लक्स
आयोग्य आहार हे आम्लता (acidity) होण्यामागचे मुख्य कारण आहे, असे मत डॉ.पी.व्ही रंगनायकुलू यांनी व्यक्त केले. आजच्या काळात आम्लता ही तरुण आणि वृद्ध सर्वांना भेडसवणारी सर्वात सामान्य समस्या आहे. अगदी काही मुले देखील अॅसिड रिफ्लक्सच्या समस्यनेने ग्रस्त आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जवजवळ 70 टक्के लोकसंख्या ही आम्लतेने (acidity) प्रभावित आहे, अशी माहिती डॉ.पी.व्ही रंगनायकुलू यांनी दिली.
पचनक्रिया होत असताना जेवनाचे छोटे तुकडे होतात. हे तुकडे अन्ननलिकेतील (esophagus) हायड्रोक्लोरिक आम्लच्या (hydrochloride acid) अॅसिड लेअरमधून पार होतात. त्यामुळे, पोटात आणि छातीत जळजळ होण्यास सुरुवात होते. पोटातील म्युकस (श्लेष्मा सारखा चिकट पदार्थ) हा अॅसिडला डाईल्यूट (सौम्य) करतो, यामुळे पोटात दाह होत नाही. जेव्हा पोटात जास्त हायड्रोक्लोरिक अम्ल असते किंवा श्लेष्माचे (mucus) स्त्राव करणारे सेल लाईनींग खराब होतात तेव्हा व्यक्तीला पोटात जळजळ वाटायला लागते. तीव्र अम्लतेला (Acute acidity गॅस्ट्रोइसोफाजिएल रिफ्लक्स (GERD- Gastroesophageal reflux) आजार देखील म्हणतात.
गॅस्ट्रोइसोफाजिएल रिफ्लक्स हे पोटात कमी अम्ल असणे (low stomach acid), मॅग्नेशियम कमतरता, काही पदार्थ, सवयी, हर्निया आणि लवकर जेवण करणे यामुळे होते. लिंबूवर्गीय पदार्थ (citrus foods), दारू, मसालेदार पदार्थ, पेपरमिंट अशी पदार्थ खाणे टाळल्यास आराम मिळू शकतो. मनापासून खाण्याचा प्रयत्न करा, तसेच 20 ते 30 वेळा चाऊन खा, असा सल्ला डॉ.पी.व्ही रंगनायकुलू यांनी दिला.
आम्लपित्ताची (hyperacidity) कारणे
आम्लपित्त होण्याची बरीच कारणे आहेत, त्यापैकी प्रामुख्याने जी कारणे आहेत ती पुढील प्रमाणे,
1) तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे.
2) आम्लता (acidity) घडवणारे अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात खाणे.
3) अयोग्य किंवा अपुरी झोप.
4) बरेच तास उपाशी राहणे.
5) बरेच कालावधी पेन किलरचे सेवन करणे.
6) गरोदर असतानाही महिलांना आम्लतेचा अनुभव होतो.
7) जास्त प्रमाणात मीठ खाणे.
8) जास्त प्रमाणात दारू आणि कॅफिनचे सेवन केल्यानेही आम्लता होऊ शकते.
9) जास्त जेवन करणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे.