हैदराबाद : आजकाल धूळ, प्रदूषण, ताण-तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. अकाली पांढऱ्या केसांना काही घरगुती उपाय करून केस काळे करता येतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला लहान वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर केसांच्या काळजीमध्ये या नैसर्गिक गोष्टींचा समावेश करा. जाणून घेऊया त्या नैसर्गिक गोष्टींबद्दल...
1. मोहरी तेल आणिकडीपत्ता :सौंदर्य तज्ञांच्या मते, मोहरीच्या तेलामध्ये कडीपत्ता (Kadipatta) उकळून घ्या. हे तेल नियमित रात्री झोपताना केसांना लावा. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने नियमितपणे केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. 2. खोबरेल तेल आणि लिंबू : खोबरेल तेल केसांना नैसर्गिकरित्या मजबूत करण्यास मदत करते. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना मसाज करा. याचा नियमित वापर केल्यास केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
3. कांद्याचा रस :कांद्याचा रस पांढरे केस कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हे केसांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त आहे. ऑलिव्ह ऑईलमध्ये कांद्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून स्कॅल्पला मसाज करा, यामुळे केस मजबूत होतील आणि पांढरे केस कमी होतील. 4. रोज एक फळ खा: फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते हे आपल्याला माहित आहे. दिवसातून तुम्ही कोणतेही एक फळ खाल्ले तर तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचवू शकता. फळांमुळे मेटाबॉलिझम चांगला राहण्यास मदत होते तसेच फळांमध्ये फायबर असल्याने शरीर डिट़ॉक्स व्हायला मदत होते. त्यामुळे न चुकता फळे खाणे संपूर्ण तब्येतीबरोबरच केसांसाठीही चांगले असते.
5. पेरुची पाने :पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावा. 6.कोरफड : कोरफड जेलमध्ये लिंबूचा रस टाकून पेस्ट बनवून केसांना आणि मुळांना लावा. हे नियमित लावल्याने पांढरे केस काळे होतील. 7. ब्लॅक टी : ब्लॅक टीच्या अर्काने केस धुवा. दोन दिवसांतून एकदा हे केल्याने फरक दिसून येईल. ब्लॅक टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे केस निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. त्याच्या मदतीने तुम्ही हेअर कलर देखील करू शकता. 8. आवळा : नियमित आवळा खाल्ल्याने सुद्धा केस काळे होतात. आवळ्याची पावडर मेंहदीमध्ये मिसळून लावा.